लाडकी बहीण योजना ; जुनचा हप्ता खात्यात जमा, तुमचा हप्ता जमा झाला का ?
लाडकी बहीण योजना ; जूनचा हप्ता जमा होनार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून, आतापर्यंत ११ हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जून महिन्याचा हप्ता सोमवारी (ता. ३०) जमा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच या हप्त्यासाठी ३६०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत असेही स्पष्ट केले.
रविवारी 29 जून रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ही माहिती दिली. “महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेली ही योजना पुढेही नियमितपणे सुरू राहणार आहे.” अशी माहिती अजीत पवारांनी दिली.
जूनचा, हप्ता उशिरा मिळत असल्याने जून आणि जूलैचा हप्ता एकत्रित 3000 रूपये मिळतील अशी चर्चा होती. मात्र, यावेळी फक्त जूनचाच हप्ता जमा होणार आसुन आजपासून खात्यात जमा होन्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजना : अपात्र लाभार्थी तपासणी सुरू
अपात्र महिलांना मिळनारा लाभ रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. काही महिलांनी अयोग्य माहिती देऊन लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर आयकर विभाग त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची तपासणी करत आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही…