आधार कार्ड मोबाईलवरून अपडेट करन्याची सोपी पद्धत, लगेच पहा..

आधार कार्ड मोबाईलवरून अपडेट करन्याची सोपी पद्धत, लगेच पहा..

तुमच्या आधार कार्डवरील माहिती अपडेट करणं आता खूप सोपं झालं आहे. तुम्ही ते तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या ऑनलाइन अपडेट करू शकता, किंवा जवळच्या आधार केंद्राला भेट देऊनही बदल करू शकता. विशेष म्हणजे, १४ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अपडेट सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे!

ऑनलाइन काय अपडेट करू शकता?

तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील खालील माहिती ऑनलाइन अपडेट किंवा दुरुस्त करू शकता.

नाव (Name)
जन्मतारीख (Date of Birth)
लिंग (Gender)
पत्ता (Address)

यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in वर जावे लागेल.

🔷सर्वात आधी https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर जा.
‘Log in’ पर्यायावर क्लिक करा.
🔷तुमचा आधार कार्ड नंबर आणि दिलेला कॅप्चा भरा.
🔷’Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि ‘Log in’ वर क्लिक करा.

🔷लॉगिन झाल्यावर, ‘My Aadhaar’ हे पेज उघडेल. येथे तुम्हाला विविध सेवा दिसतील.
🔷’Online Update Services’ या रकान्यावर क्लिक करा.

🔷आता ‘Update Aadhaar Online’ निवडा. येथे आधार अपडेट प्रक्रियेची थोडक्यात माहिती दिलेली असेल.

🔷’Proceed to Update Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.
पुढील पेजवर, तुम्हाला नाव, जन्मतारीख, लिंग किंवा पत्ता यापैकी जी माहिती अपडेट करायची आहे, तो पर्याय निवडा.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला पत्ता (Address) अपडेट करायचा असेल, तर ‘Address’ या रकान्यावर क्लिक करून ‘Proceed to Update Aadhaar’ वर क्लिक करा.

🔷येथे तुम्हाला तुमचा जुना पत्ता (‘Current Details’) दिसेल.
‘Details to be Updated’ मध्ये तुम्हाला अपडेट करायची असलेली नवीन माहिती भरा. सुरुवातीला इंग्रजीमध्ये आणि नंतर मराठीमध्ये (आवश्यक असल्यास) माहिती भरा.
‘Area’ मध्ये गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव भरा. पिन कोड टाकताच राज्य आणि जिल्ह्याचे नाव आपोआप येईल.
🔷तुमचे गाव (Village) आणि पोस्ट ऑफिस (Post Office) चे नाव निवडा.
सहाय्यक कागदपत्रे अपलोड करा:

🔷’Select Valid Supporting Document Type’ मध्ये दिलेल्या यादीतून एक वैध कागदपत्र निवडा.
🔷’View details and upload documents’ वर क्लिक करा. सूचना वाचून ‘Continue to upload’ वर क्लिक करा आणि निवडलेले कागदपत्र अपलोड करा.
🔷कागदपत्र अपलोड झाल्यावर ‘Next’ वर क्लिक करा.

🔷येथे तुम्हाला तुम्ही अपडेट केलेली नवीन माहिती दिसेल. ती काळजीपूर्वक तपासा.
🔷दिलेल्या दोन्ही पर्यायांवर टिक (✓) करा आणि ‘Next’ वर क्लिक करा.
शुल्क भरा (केवळ काही सेवांसाठी, सध्या पत्त्यासाठी विनामूल्य):

🔷तुम्हाला ५० रुपये शुल्क भरायचे असेल. सध्या, नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्त्यासाठी १४ जून २०२६ पर्यंत शुल्क आकारले जात नाही. परंतु, भविष्यात शुल्क आकारल्यास, सूचनांवर टिक करून ‘Make payment’ वर क्लिक करा.
डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI, नेटबँकिंग, पेटीएम, व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता.

🔷पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला पावती डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल. ‘download acknowledgement’ वर क्लिक करून तुमची पावती (PDF) डाउनलोड करा. या पावतीवर तुमचा अर्ज क्रमांक (URN) असेल.
UIDAI च्या माहितीनुसार, पुढील ३० दिवसांत तुमचे आधार कार्ड अपडेट होईल. तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती UIDAI च्या वेबसाइटवर ट्रॅक करू शकता.

आधार केंद्रावर जाऊन काय अपडेट करू शकता?

जर तुम्हाला मोबाईल नंबर, ई-मेल आयडी किंवा तुमचा बायोमेट्रिक डेटा (उदा. फिंगरप्रिंट्स, आयरिस स्कॅन) अपडेट करायचा असेल, तर तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्राला (Aadhaar Seva Kendra) भेट द्यावी लागेल.

आधार अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क लागेल.
शुल्क भरल्यावर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN) दिला जाईल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या अपडेटचे स्टेटस पाहू शकता.
जवळपास ३० दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला SMS द्वारे तसे कळवले जाईल.

Leave a Comment