दादा लाड यांच्या पद्धतीने कापूस लागवड कशी करावी?
नमस्कार शेतकरी मित्रांनो दरवर्षी कापूस पिकाच़ उत्पादन घटतंच चाललं आहे. कधी दुष्काळ तर कधी आतीव्रुष्टी सोबत कधीकधी शेतकऱ्यांच नियोजन चुकतं.कापूस पिकाचं भरपूर उत्पादन घ्यायचं आसेल तर योग्य नियोजन आतीशय महत्त्वाच आहे.
दादा लाड यांनी कापूस लागवडीचं एक भन्नाट तंत्र विकसित केलं आसून हे तंत्र खरोखरच सक्सेस ठरलं आहे. दादा लाड हे एक सामान्य शेतकरी आहेत मात्र त्यांनी कापूस पिकाचं जबरदस्त तंत्र तयार केलं आहे.
लाड यांनी त्यांच्या शेतात कपाशीच्या बुडातल्या गळफांद्या काढून टाकल्या.फक्त झाडावर तेवढ्या फळफांद्या ठेवल्या. यामुळे फळफांद्या ना भरपूर आन्नद्रव्ये मिळत गेली आणि झाडाचे खोड शेंड्यापर्यंत जाड होते.सोबतंच शेंड्यापर्यंत कैरीची साईझ जबरदस्त आसल्याने कापसाला भरपूर वजन मिळाले.सोबत एकरी झाडांची संख्या वाढली त्यामुळे या पद्धतीने त्यांना भरपूर उत्पादन मिळाले.
दादा लाड यांच्या पद्धतीने कापूस लागवड कशी करावी?
1)दोन झाडे आणि दोन ओळीतील आंतर कमी करून झाडे जास्त बसवली जातात.
2)3×1 किंवा 2.5×1 किंवा 3.5×1 एवढ्या आंतरावर लागवड.
3)झाडाच्या खालच्या गळफांद्या काढून/कापूस टाकाव्या.
4)झाडावर फक्त फळफांद्या ठेवा,गळफांद्या नको.
5)दाट लागवड असल्याने खत कमी द्यावे.
दादा लाड ; या लागवड पद्धतीचे फायदे काय?
१)एकरी झाडांची संख्या वाढते.
२)गळफांद्या काढल्याने दाटी कमी होते.
३)गळफांद्या फक्त दाटी करतात,फार काही कैर्या लागत नाही त्यामुळे गळफांद्या काढ्लाने फायदा होतो.
४)गळफांद्या काढल्यावर खोड शेंड्यापर्यंत जाड बनते.
५)गळफांद्या काढल्याने बोंडाची साईझ शेंड्यापर्यंत एक नंबर आसते.
६)बोंड शेंड्यापर्यंत टपोरे आसल्याने कापसाचे वजन वाडते.
७)झाडांची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ होते.