पंजाब डख – राज्यात एवढे दिवस पावसाची विश्रांती, या तारखेपासून पुन्हा मुसळधार

पंजाब डख – राज्यात एवढे दिवस पावसाची विश्रांती, या तारखेपासून पुन्हा मुसळधार

सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी पुढचे 15 दिवस राज्यातील हवामान कसे राहील, पावसाची उघाड किती दिवस आणि पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात कधी होईल याबाबत सविस्तर अंदाज दिला आहे, हाच अंदाज आपण या लेखात सविस्तर पाहू…

 

पंजाब डख – राज्यात एवढे दिवस पावसाची विश्रांती

पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात सोमवार, २८ जुलैपासून पावसाचा जोर कमी होऊन थोडी विश्रांती आणि अनेक ठिकाणी सूर्यदर्शन होईल. २८ जुलै ते ११ ऑगस्ट या काळात राज्यात सुमारे १०-१२ दिवस पावसाची विश्रांती राहील. यादरम्यान फवारणी आणि खत घालण्यासारखी शेतीची कामे शेतकऱ्यांनी करून घ्यावी असा पंजाब डख यांनी सल्ला दिलाय…

 

ऑगस्ट महिन्यात, १ ते ११ ऑगस्ट दरम्यान, स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, परंतु मोठा पाऊस येण्याची शक्यता कमी आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यात पुन्हा जोरदार पाऊस येण्याची शक्यता पंजाब डख यांनी वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

 

थोडक्यात सांगायचे झाल्यास, २८ जुलैपासून पावसाचा जोर कमी होऊन सूर्यदर्शन होईल आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही, स्थानिक वातावरणातून ठिकठिकाणी पाऊस होत राहील मात्र तो सर्वदूर नसेल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार, पहा सविस्तर

Nuksan bharpai GR आला, या जिल्ह्यांसाठी एवढा निधी मंजूर

Leave a Comment