महाराष्ट्र हवामान ; विदर्भ मराठवाड्यात या तारखेपासून पाऊस वाढनार
महाराष्ट्र हवामान ; राज्यातील काही भागात मागील ३ दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. मात्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस कमीच आहे. तर विदर्भातील काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज दिलाय तर मंगळवारपासून विदर्भातही पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. (शनिवार, रविवार, सोमवारी 28-30 जून) घाटमाथा वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडन्याचा अंदाज आहे.
Wheather forecast ; पुढील पाच दिवसांचा अंदाज
हवामान खात्याने पुढील 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय..
महाराष्ट्र हवामान ; विभागानुसार हवामान अंदाज
विदर्भ ; मंगळवारपासून विदर्भातही पावसाचा जोर वाढन्याची शक्यता आहे. मंगळवार आणि बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा ; मंगळवारपासून विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोकण&मध्य महाराष्ट्र ; कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पुढील 5 दिवस काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो, घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
मान्सूनने जवळजवळ संपूर्ण देश व्यापला आहे, फक्त थोडासा भाग बाकी आहे. मान्सून पुढील दोन दिवसांत देशाच्या उर्वरित भागात दाखल होईल आणि संपूर्ण भारताला व्यापून टाकेल अशी शक्यता आहे.