रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या आठवड्यात पाऊस कमीच, पहा साबळे यांचा अंदाज
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; हवेच्या दाबात आजपासून (ता.३० जून ते ५ जुलै) शनिवारपर्यंत वाढ होन्याची शक्यता आसुन हवेचे दाब १००४ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. त्यामुळे काही काळ पावसात उघडीप, तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या शक्यता निर्माण होईल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
हवामान बदलाच्या प्रभावाने हवेच्या दाबात सतत बदल होतात. अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असल्याने हवेचे दाब वाढत आहेत. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन ढगांची निर्मिती कमी होऊन पावसाचे प्रमाण कमी होन्याची शक्यता आहे. जवळपास 5 जूलैपर्यंत हवेचे दाब वाढलेलेच राहनार आसल्याने विदर्भ मराठवाड्यात चांगल्या पावसासाठी वाट पहावी लागनार आहे.
हलक्या पावसाची शक्यता
रामचंद्र साबळे यांच्या माहीतीनुसार सध्या बंगालचे उपसागराच्या व हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत असल्याने बंगालच्या उपसागराची शाखा कार्यरत राहत आहे. त्यातूनच ढगनिर्मिती होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण होईल. मात्र यातून तुरळकच ठिकाणी हलका पाऊस पडेल.
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; मान्सून 2025
हवेचे दाब वाढले की पावसाचे प्रमाण कमी होते आणि आता पुढील 5-6 दिवस हवेचे दाब वाढन्याची शक्यता आसल्याने मोठ्या पावसाची विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वाट पहावी लागेल. प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १७ अंश सेल्सिअस, तर इक्वेंडोरजवळ २३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने तेथील हवेच्या दाबात वाढ होत आहे. हिंदी महासागरावरील वारे भारताचे दिशेने येत आहेत….