रामचंद्र साबळे ; या आठवड्यात पाऊस कसा राहील, खंड किती दिवस ?
रामचंद्र साबळे यांनी ३० जुलै ते २ ऑगस्ट या चार दिवसांसाठी महाराष्ट्राकरिता हवामानाचा सविस्तर अंदाज आणि कृषी सल्ला दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, बुधवार, ३० जुलै आणि गुरुवार, ३१ जुलै रोजी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये १००२ ते १००४ हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील, ज्यामुळे राज्याच्या उत्तर भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. याउलट, शुक्रवार, १ ऑगस्ट आणि शनिवार, २ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रावर हवेचा दाब वाढेल, उत्तरेकडील भागांत १००४ हेक्टोपास्कल तर दक्षिणेकडील भागांत १००६ हेक्टोपास्कल दाब वाढल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे..
पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! या तारखेला होनार जमा
रामचंद्र साबळे पुढील 4 दिवस पाऊस कसा, जिल्हानुसार
मराठवाड्यासाठी (धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर) या चार दिवसांत २ ते १० मि.मी. हलक्या पावसाची शक्यता रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे.
विदर्भात, पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये दररोज १ ते १२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. यामध्ये १२ मि.मी. पाऊस आजसाठी असून, त्यानंतर फक्त १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये दररोज १ ते १० मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. पूर्व विदर्भासाठी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये उद्यापासून ३ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे.
पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! या तारखेला होनार जमा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ते २२ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात १८ ते ३५ मि.मी., रायगड जिल्ह्यात १० ते ३५ मि.मी., ठाणे जिल्ह्यात १५ ते ३४ मि.मी. आणि पालघर जिल्ह्यात १० ते २५ मि.मी. मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात १० ते २० मि.मी. मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये दररोज २ ते १२ मि.मी. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या १८ ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे, तर सांगली, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये दररोज ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
रामचंद्र साबळे ; आँगष्ट, सप्टेंबर मुसळधार
१ जून ते २३ जुलै या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या नाशिक, धुळे, नंदुरबार, बीड, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, बीड, आणि अमरावती या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी काळजी करू नये, कारण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे – डॉ. साबळे
शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना डॉ. साबळे यांनी सांगितले की, राहूरी, मंगळवेढा, सोलापूर, लातूर, जालना, पुणे, पैठण, परभणी, पालीम, संभाजीनगर, बीड, माजलगाव, नांदुरा, बडगाव, जळगाव, शिरूर, कासार, धुळे आणि मालेगाव या सर्व भागांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! या तारखेला होनार जमा