लाडकी बहीण योजना हप्ता २१०० रूपये कधी होनार ?
लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० वरून २१०० रूपये करण्यात येईल आणि महिलांना दरमहा २१०० रुपये दिले जातील असे सरकारने निवडणूकीपुर्वी वचन दिले होते..मात्र सरकार स्थापन होउन ६ महिने झाले तरी याबाबत कोनताही निर्णय घेन्यात आलेला नाही.
लाडकी बहीण योजना हप्ता २१०० रूपये कधी होनार ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर म्हनाले की ‘आम्ही लाडक्या बहीणींना २१०० रूपये देन्याचं वचन विसरलो नाही आम्ही लाडक्या बहीणींना २१०० लवकरच सुरू करू, आपली अर्थव्यवस्था वाढत आहे. हळूहळू परिस्थिती वाढत जाईल तेव्हा २१०० रुपये दिले जातील… तसेच महसूल मंत्री बावनकुळे यांनी लाडक्या बहीनींचा हप्ता २१०० रूपये करनार आहोत अशी घोषणा केली आहे. मात्र १५०० एवजी २१०० रूपये कधी सुरु होतील याबाबत काहीच स्पष्ट नाही.
बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी ईतरही काही घोषणा केल्या आहेत, केलेल्या ईतर घोषणा अशा आहेत👇👇
■ खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आसलेल्या गरीब गरजू शेतकऱ्यांसाची कर्जमाफी हे सरकार करेल, (Karjmafi news)
■ शेतकऱ्यांना 5 वर्षे वीज बिलात सवलत ; पुढील पाच वर्षांसाठी शेतातील पंपाचे आणि विजेचे बिल माफ केले जाईल.
■ घरगुती वीज बिलाचे दर ८ रुपये २० पैशांवरून ६ रुपये प्रति युनिट केले जातील.
■ पांधन रस्त्यांसाठी निधी: अमरावती जिल्ह्यातील पांधन रस्त्यांसाठी निधी दिला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते मिळतील.