सोयाबीन खत व्यवस्थापन ; या खताने सोयाबीन उत्पादनात दुप्पट वाढ शक्य

सोयाबीन खत व्यवस्थापन ; या खताने सोयाबीन उत्पादनात दुप्पट वाढ शक्य

सध्या शेतकरी सोयाबीन पेरणीच्या तयारीत आहेत, त्यामुळे सोयाबीन पेरताना कोणती खते वापरावीत याबाबद माहिती या लेखातून जानून घेउयात..

सोयाबीन हे ९० ते १०५ दिवसांचे पीक आहे आणि त्याला ७० सुरुवातीच्या काळात खतांची आवश्यकता असते. म्हणून, पेरणीच्या वेळी (फक्त एकदाच) सोयाबीन पिकासाठी खतांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.

खतांचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी सोयाबीन पिकांसाठी कोणते खत सर्वोत्तम आहे आणि प्रति एकर किती द्यावे? चला पाहूया सविस्तर👇

१) १० २६ २६ ; सोयाबीन पेरताना हे खत १.५ ते २ बँग प्रति एकर वापरू शकता, कारण त्यात नायट्रोजनचे प्रमाण कमी असते, म्हणून ते सोयाबीनसाठी फायदेशीर आहे, कारण सोयाबीन वातावरणातून त्याची नायट्रोजनची गरज पूर्ण करते. जर तुम्ही १०.२६.२६ देत असाल तर त्यात ५-१० किलो सल्फर प्रति एकर मिसळुन द्यावे कारण सोयाबीन ला सल्फर ची आवश्यकता असते.

किंवा

२) २०.२०.००.१३ खत एकरी ६० किलो वापरू शकता. या खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर असते. जर तुम्ही २०.२०.०.१३ खत वापरत असाल तर त्यात ३० किलो पोटॅश घ्या..

किंवा

३) १२ ३२ १६ खत एकरी १ ते १.५ बँग वापरू शकता. यासोबत, प्रति एकर ५-१० किलो सल्फर मिक्स करून देनं देखील आवश्यक आहे.

सोयाबीन पेरताना वर सांगितलेल्या कोणत्याही खतांचा वापर केल्यास सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळू शकते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा…

Leave a Comment