हवामान अंदाज 15 जूलै ; या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

हवामान अंदाज 15 जूलै ; या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याकडून आज कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आलाय तर पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कधी, पहा सविस्तर

उत्तर महाराष्ट्र ; धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने जारी केलाय

मराठवाडा ; नांदेड, लातूर, धाराशिव , हिंगोली, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे…

विदर्भ ; आज विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यासाठी कोणताही विशेष अलर्ट नाही. त्यामुळे, विदर्भात आज पावसाला काही प्रमाणात विश्रांती मिळण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कधी, पहा सविस्तर

उद्यापासून विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे अशी माहिती के.ऐस होसाळीकर यांनी दिली आहे.

रोजच्या हवामान अंदाजासाठी आपण आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कधी, पहा सविस्तर

Leave a Comment