०६ जूलै हवामान ; पावसाची विश्रांती, फक्त याच जिल्ह्यात पाऊस…
०६ जूलै हवामान ; राज्यात पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते काही ठिकाणी अतीमुसळधार पावसाची तर पुर्व विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
०६ जूलै हवामान ; या भागात पाऊस कमीच
पुढील 24 तासात मराठवाडा ,पश्चिम विदर्भ, घाटमाथा वगळता मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात कोनताही अलर्ट नाही, फक्त तुरळकच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. (IMD, भारतीय हवामान विभाग)
पुढील 24 तासात या जिल्ह्यात पाऊस
विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट…..तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट, ठाणे, पालघर मुसळधार पावसाचा यल्लो अलर्ट, मध्य महाराष्ट्रील घटमाथ्यावरही मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.
आजपासून पुढील 3 दिवस विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता नसून फक्त तुरळकच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.०६ जूलैपासून विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय