कापूस तननाशक ;कापूस पिकामध्ये कोनते तननाशक वापरावे ?….Cotton herbicide

कापूस तननाशक ;कापूस पिकामध्ये कोनते तननाशक वापरावे ?….Cotton herbicide

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.विदर्भ मराठवाड्यात कापूस लागवडीचं क्षेत्र खुप मोठं आहे. कापूस पिकाचं योग्य आंतर,योग्य खत व्यवस्थापन आणि किडरोग नियंत्रण केल्यास कापूस पिकामधुन चांगले ऊत्पादन घेता येते.

यासोबतच कापूस पिकामध्ये तन नियंत्रण करनंही तेवढंच महत्त्वाचे आहे. कापूस पिकामध्ये बैलपाळ्या मारून शेत तनविरहीत आसलं पाहिजे.उरलेल्या गवताचं नियंत्रण खुरपणी करून शेतकरी करतात.

अनेकदा वेळेवर मजूर मिळत नाहीत, शेतात वापसा नसते,किंवा ईतर कारनामुळे तन नियंत्रण शक्य होत नसल्यास शेतकरी कापूस पिकामध्ये तननाशकाचा वापर करू शकतात.तर कोनते तननाशक वापरले पाहिजे त्याचे प्रतीपंपासाठी प्रमाण किती घ्यावे, कोनती गवत जळनार,फवारणी करताना काय काळजी घेतली पाहिजे सविस्तर पाहूया….

कापूस तननाशक फवारणी करताना हि काळजी घ्या…..

1)जमीन ओली आसावी,कोरडी जमीन आसताना फवारणी केल्यास रिझल्ट मिळनार नाहीत..

2)औषधाचं प्रमाण कमीजास्त आजीबात करू नये(कमि केल्यास रिझल्ट कमी)(जास्त झाल्यास पिकावर परिणाम)

3)कापसाचं पिक 21 दिवसाचं झालेलं आसावं…

4)गवत लहान-लहान 3-4 पानावर आसावं..

5)कडक उन्हात फवारणी करू नये(पहाटे किंवा दुपारनंतर)

6)राउंडअप चा पंप आसेल तर स्वच्छ धुवून वापरावा…

7)तननाशकासोबत किटकनाशक, बुरशीनाशक किंवा विद्राव्य खते मिक्स करू नये….

8)कपाशीला फुले लागल्यानंतर वापर करू नये..

 

कापूस तननाशक कोनते वापरावे (घटक आणि औषधाचे नाव)

या तननाशकातील घटक आहे Pyrithiobac sodium 6% + Quizalofop wthyl 4% हा घटक आसलेले वेगवेगळ्या कंपन्याचे तननाशके मार्केटमध्ये ऊपलब्ध आहेत..

1)गोदरेज कंपनीचं हिटविड मँक्स

2)बायर कंपनीचं GHASA

3)धानुका कंपनीचं DOZO MAXX.

यापैकी कोनतेही एक तननाशक वापरू शकता.

 

कापूस तननाशक,प्रमाण किती घ्यावे…?

एकरी 200 लिटर पान्यामध्ये 450 मिली एवढं औषध मिसळून फवारणी करावी…

प्रतीपंपाच्या हिशोबाने साधारणपणे 20 लिटरच्या पंपाला 45 मिली औषध घ्यावे..

1(औषधाची मात्रा कमीजास्त करू नये)

2(कपाशीला फुले लागल्यानंतर वापर करू नये)

3)20-30 दिवसादरम्यान फवारणी केल्यास चांगले रिझल्ट मिळतील)

 

शेतकरी मित्रांनो हि माहिती आवडली आसेल तर जास्तीत शेतकऱ्यांना शेयर करा…

Leave a Comment