वांगी लागवड/Vangi lagvad/वांगी लागवड कशी करावी/वांगी लागवड माहिती मराठी..

वांगी लागवड/Vangi lagvad/वांगी लागवड कशी करावी/वांगी लागवड माहिती मराठी..

वांगी हे भाजीपाला पिकातील एक महत्त्वाचे पिक आसून, अनेकांची आवडती भाजी वांगी आहे. या वांगी पिकाच्या लागवडीमधून शेतकऱ्यांना भरपूर उत्पादन मिळवता येते.तर वांगी लागवड करन्यासाठी जमीन कशी आसावी, लागवडीचे हंगाम, आंतर किती ठेवावे,कोनते बियाणे वापरावे, खत व्यवस्थापन, तसेच किड नियंत्रण कसे करावे हि संपूर्ण माहिती आपण पाहनार आहोत.

वांगी लागवड करन्यासाठी हंगाम

वांगी पिकाला ढगाळ वातावरण आणि पाऊस आसे वातावरण चालत नाही. ढगाळ वातावरणात वांगी पिकावर फळ पोखरनारी आळी आनी शेंडेआळीचा प्रादुर्भाव होते.तसेच फुलगळीचं प्रमान वाढते.

त्यामुळे वांगी लागवड आँगष्ट ते फेब्रुवारी या दरम्यान केल्यास चांगले उत्पादन घेता येते.

 

वांगी लागवडीसाठी जमीन कशी आसावी-

वांगी लागवड हालक्या, मध्यम किंवा भारी आशा कुठल्याही जमीनीत करता येते.काळ्या कसदार किंवा मध्यम जमिनीत वांग्याची जोमाने वाढ होते आई जास्तीत जास्त ऊत्पादन मिळते.हालक्या जमिनीत पाणी आणि खताचे योग्य नियोजन केल्यास वांगी लागवड करता येते.

 

वांगी लागवडीसाठी बियाणे कोनते निवडावे-

वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जातींच्या वांग्याला पसंती दिली जाते. त्यामुळे आपल्या भागात मागणी आसलेल्या वानाची लागवड फायदेशीर ठरू शकते.यासाठी आपण आपल्या परिसरातील वांगी ऊत्पादक शेतकऱ्यांचा सल्ला घेऊ शकता.

वांगी लागवडीसाठी रोपे कशी तयार करावी-

वांगी लागवडीसाठी आपन नर्सरी मधून रोपे खरेदी करू शकता.किंवा घरीसुद्धा रोपे तयार करू शकता.रोपे तयार करन्यासाठी 4×6 फुट रूंदी आसलेले वाफे तयार करून त्यात खुरप्याच्या सहाय्याने रेघा ओढून बि पेरावे.रोपे टाकतानाच 20.20.00.13 हे योग्य प्रमाणात खत टाकावे.तसेच शक्य आसल्यास खतामध्ये बुरशीनाशक मिसळावे जेने करून रोपांची मर होनार नाही. रोपाला नियमित पान्याची आवश्यकता आसते,त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन करावे. पाणी रोपामध्ये साचनार नाही याची काळजी घ्यावी.

वांगी लागवडीसाठी आंतर किती ठेवावे-

वांगी पिक हे जास्त कालावधी आसलेलं पिक आहे. तसेच भरपूर फळफांद्या आणि वाढ होनारे पिक आसल्यानै भरपूर आंतर ठेवनं आवश्यक आसते.वांगी लागवड ठिबकवर किंवा पाटपान्यावरही करता येते.

साधारनपने वांगी लागवडीसाठी 4.5×1.5 किंवा 5×1.5 हे आंतर निवडावे.एवढे आंतर ठेवल्यास शेवटपर्यंत वांगी तोडन्यासाठी सोपे जाते.आणि हवा सुर्यप्रकाश भरपूर मिळाल्याने वांग्याची काँलीटी आणि उत्पादन भरपूर येते.

वांगी लागवड खत व्यवस्थापन

वांगी हे जास्त कालावधी आसलेलं पिक आहे. यामुळे एकदाच खते न देता 20-30 दिवसाच्या आंतराने खते देनं फायदेशीर ठरते.

खतांचा वापर करताना 15.15.15 किंवा 18.46.00+ पोट्याश….किंवा 10.26.26 यापैकी कोनतीही खते वापरू शकता.

तन नियंत्रण-

वांगी पिकात कोणत्याही तननाशकाचा वापर करू नये.खुरपनी करून तननियंत्रन करनं आवश्यक आहे. पिकामध्ये गवत होनार नाही याची विशेष काळजी घ्यावी नसता किड रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

 

वांगी पिकामधील शेंडेआळी,फळ पोखरनारी आळी नियंत्रण-

वांगी पिकामध्ये प्रामुख्याने फळ पोखरनारी आळी आणि शेंडेआळीचा प्रादुर्भाव होते.या आळ्यामुळे वांगी ऊत्पादन मोठ्या प्रमाणात घटते त्यामुळे योग्य वेळी आळी नियंत्रण आवश्यक आहे.

आळी नियंत्रणासाठी टप्यानुसार किटनाशकाचा वापर करावा.सुरूवातीला साधी किटनाशक नंतर स्ट्राँग किटकनाशके वापरावी..

खालील किटकनाशके टप्प्या टप्प्यात क्रमानुसार वापर करू शकता.

1)ईमामेक्टीन बेन्झोएट(प्रोक्लेम) 2)फ्युमेडामाईड(फेम) 3)लँमडा सायहँलोथ्रिन+क्लोरंटानिलीप्रोल(अँम्प्लीगो)

4)क्लोरंटानिलीप्रोल(कोराजन) 5)स्पिनोटेराम(डेलीगेट) 6)स्पिनोसँड(ट्रेसर)

किंवा क्लोरोपायरीफाँस,प्रोफेनोफाँस,ट्रायझोफाँस,लँमडा सायहँलोथ्रिन यापैकी किटनाशके वापरू शकता.

आळी नियंत्रण होत नसेल तर शेवटचा पर्याय डेलीगेट किंवा ट्रेसर आहे हि किटकनाशके रिझल्ट नक्कीच देतील.

तसेच वांगी पिकामध्ये तुडतुडे पांढऱ्या माशीचाहि प्रादुर्भाव होते जर प्रादुर्भाव दिसत आसेल तर आलीका या किटनाशकाचा वापर करू शकता.

माहिती आवडल्यास शेयर नक्की करा,धन्यवाद

Leave a Comment