रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पुढील ४ दिवस विदर्भ मराठवाड्यात पाऊस कमीच

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पुढील ४ दिवस विदर्भ मराठवाड्यात पाऊस कमीच

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; डाँ. रामचंद्र साबळे यांनी २५ जून ते २८ जून या चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे, जूलैमध्ये पाऊस कसा राहील आणि पावसात खंड आहे का याबाबतही माहिती दिली आहे.. सविस्तर पाहूयात

 

सध्या महाराष्ट्रावर हवेचे दाब बुधवार आणि गुरुवारी १००४ हेक्टोपास्कल, तर शुक्रवार आणि शनिवारी १००२ हेक्टोपास्कल एवढे राहतनाय आसुन २५-२८ जूनदरम्यान दक्षिण कोकणात ३५ ते ६५ मिलिमीटर( मुसळधार) , उत्तर कोकणात २५ ते ६५ मिलिमीटर (मुसळधार) उत्तर महाराष्ट्रात ५ ते १० मिलिमीटर (हलका ते मध्यम) मराठवाड्यात ३ ते ६ मिलिमीटर (हलका ते मध्यम) पश्चिम विदर्भात ६ ते १२ मिलिमीटर (हलका ते मध्यम) मध्य विदर्भात ७ ते १४ मिलिमीटर (हलका ते मध्यम)
पूर्व विदर्भात ८ ते १३ मिलिमीटर (हलका ते मध्यम)
दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात ४ ते २३ मिलिमीटर (हलका ते मध्यम) पाऊस पडेल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिलाय.

चांगल्या पावसाला सुरुवात कधी होईल असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आसता डाँ साबळे म्हनतात ; हवेचे दाब कमी झाल्यास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चांगला पाऊस सुरू होईल, यासाठी आता जास्त वाट पहावी लागनार नाही.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; जूलैमध्ये पावसात खंड

जूलैमध्येही पावसात खंड पडू शकतो अशी माहिती साबळे यांनी दिली आहे. जून जूलैमध्ये पावसात खंड पडतील असे साबळे यांनी 2 जूनलाच सांगितले होते त्यानुसार जूनमध्ये पावसाचा खंड पहायला मिळाला. जुलै महिन्यातही पावसाचा लहान खंड आहे असेही डाँ. साबळे म्हनाले.

हवेचे दाब आणि पावसाचा संबंध काय ?

यावर डाँ साबळे म्हनाले की ९९८ ते १००० हेक्टोपास्कल हवेचा दाब असताना कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन जोरदार पाऊस होतो, तर १००२-१००४ हेक्टोपास्कलला मध्यम पाऊस पडतो आणि १००६-१००८ हेक्टोपास्कलला पाऊस थांबतो, आणि उघडीप पहायला मिळते..

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; जुलै ते ऑक्टोबर या काळात पाऊस कसा ?

जुलै ते ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. कमी वेळेत जास्त पाऊस आणि काही काळ पावसात उघडीप अशा प्रकारचा पाऊस जूलै ते आँक्टोंबर या काळात होईल अशी माहिती साबळे यांनी दिली आहे.

Leave a Comment