सोयाबीन तननाशक ; जबरदस्त रिझल्ट देनारे टाँप 5 सोयाबीन तननाशके

सोयाबीन तननाशक ; जबरदस्त रिझल्ट देनारे टाँप 5 सोयाबीन तननाशके

सोयाबीन तननाशक ; शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये कोनत्या तननाशकाचा वापर करावा, वापरन्याचे प्रमाण, फवारणी करताना काय काळजी घ्यावी म्हणजे 100% रिझल्ट येतील याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखातून पाहूयात…

1️⃣ आदामा शकेद (Adama Shaked) ; हे सोयाबीन पिकासाठी वापरले जाणारे एक प्रभावी तणनाशक आहे. हे विशेषतः सोयाबीनमध्ये उगवणारे गवतवर्गीय लांब आणि रुंद पानांचे तण नियंत्रित करते.
यामध्ये प्रोपॅक्विझाफॉप 2.5% आणि इमाझेथापीर 3.75% हे घटक असतात. शकेदमध्ये दोन घटक असल्याने ते तणांवर दुहेरी पद्धतीने काम करते. हे तणांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अमीनो ऍसिड संश्लेषण आणि फॅटी ऍसिड संश्लेषण यात अडथळा निर्माण करते.यामुळे तणांमधील डीएनए संश्लेषण आणि पेशींची वाढ थांबते, ज्यामुळे शेवटी तण मरून जातात.
हे लांब आणि रुंद पानांच्या दोन्ही प्रकारच्या तणांवर नियंत्रण मिळवते.प्रति 15 लिटर पंपासाठी 80 मिली
प्रति एकरसाठी 800 मिली याचा डोज आहे
फवारणी केल्यानंतर 1 ते 2 तासांत पाऊस आला तरी तणनाशक धुतले जात नाही कारण यात स्टिकर (adjuvant) मिसळलेले असते.

2️⃣ BASFओडिसी ; हे एक प्रभावी तणनाशक असून ते प्रामुख्याने सोयाबीन, भुईमूग, तूर यांसारख्या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरले जाते.ओडिसी हे गवतवर्गीय लांब आणि रुंद पानांच्या तणांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवते.

यामध्ये इमाझेथापिर (Imazethapyr): 35%
इमाझामॉक्स (Imazamox): 35% हे घटक आसतात, एकरी 40 ग्रँम एवढा याचा डोज आहे जे 300ml एक्टीवेटरमध्ये मिसळून घ्यावे लागते.

3️⃣ सिजेंटा फ्युजीफ्लेक्स ; यामध्ये फ्लुआझिफॉप-पी-ब्युटिल (Fluazifop-p-butyl) 11.1% w/w फोमेसाफेन (Fomesafen) 11.1% w/w SL हा घटक आसतो

● हे तननाशक रुंद आणि गवतवर्गीय तण नियंत्रित करते.

●40 मिली फुझिफ्लेक्स प्रति पंप किंवा 400 मिली प्रति एकर याचे प्रमाण आहे.

■ सोयाबीन तननाशक फवारणी ची योग्य वेळ

सोयाबीन पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी, जेव्हा तण 2 ते 4 पानांचे असते, तेव्हा याची फवारणी करणे योग्य ठरते.फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे महत्त्वाचे आहे.

 

सोयाबीन तननाशक फवारणी करताना हि काळजी घ्या👇👇

●फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे महत्त्वाचे आहे.

● तणनाशक फवारताना योग्य प्रमाण वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात वापरल्यास सोयाबीन पिकाला झटका बसू शकतो किंवा ते पिवळे पडू शकते.

● फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी, जेव्हा वारा कमी असतो, तेव्हा करावी. यामुळे तणनाशक इतर उडत नाही.

● फवारणी करताना स्वच्छ पाणी वापरावे…

● सोयाबीन 18-20 दिवसाचे आसतानाच फवारणी करावी..

●.गवत 2-4 पानावर आसताना फवारणी केल्यास चांगले रिझल्ट मिळतात, जास्त मोठे गवत आसेल तर करपून पुन्हा हिरवे होते..

Leave a Comment