हवामान अंदाज 27 जून ; पुढील 24 तासात फक्त या जिल्ह्यात पाऊस…
25 जून हवामान अंदाज ; पुढील काही तासात कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात मुसळधार, तर कुठे मध्यम पावसाचा अंदाज आहे, कुठल्या जिल्ह्यासाठी कोनता अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय पाहुयात सविस्तर👇👇
हवामान अंदाज 27 जून ; सर्व जिल्ह्यांचा सविस्तर अंदाज (imd)
विदर्भ ; बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय तर वाशीम नागपूर, भंडारा आणि गडचिरोली तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय….(पुढील 24 तासासाठी)
मराठवाडा ; ध.संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात विजांसह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आसून नांदेड,परभणी, हिंगोली, बिड, लातूर, धाराशिव साठी कोनताही अलर्ट नाही..
उत्तर महाराष्ट्र ;
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट
पुणे, सातारा,कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…
कोंकण ; मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या सर्वच जिल्ह्यात हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा आँरेंज अलर्ट दिला आहे.
हवामान अंदाज 27 जून ; या जिल्ह्यात हवामान कोरडे..
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बिड विदर्भातील यवतमाळ, वर्धा, गोंदिया, वाशीम तसेच आहिल्यानगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात कोनताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही, या जिल्ह्यात फक्त तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो…
