पंजाब डख म्हनतात, या तारखेपर्यंत पाऊस कमीच, पहा जूलैमध्ये पाऊस कसा ?

पंजाब डख म्हनतात, या तारखेपर्यंत पाऊस कमीच, पहा जूलैमध्ये पाऊस कसा ?

28 जून ते 07 जूलैदरम्यान पाऊस कसा राहील, कुठे पाऊस तर कुठे उघाड राहील आणि चांगल्या पावसाची शक्यता कधी आहे याबाबत पंजाब डख यांनी हवामानाचा अंदाज दिला आहे…..सविस्तर पाहू

सध्याची मोठ्या पावसाची शक्यता कमीच – पंजाब डख

सध्या राज्यात सर्वदूर पाऊस अपेक्षित नाही. तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडेल…खुप काही मोठा हा पाऊस नसेल फक्त पिकांची गरज भागेल आणि पिकांना जिवदान मिळेल असा हख पाऊस आसेल अशी माहिती डख यांनी दिली आहे..

07 जूलैपर्यंत तुरळक ठिकाणीच पाऊस.

07 जूलैपर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा तुरळकच ठिकाणी पाऊस होईल, 07 जूलैपर्यंत पावसाची शक्यता कमीच आहे. पाऊस चालू राहिलं पण तो काही ठिकाणी असेल, सर्वदूर पडनार नाही. स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडेल. – पंजाबराव डख

कोकण आणि नाशिक विभाग, पाऊस सुरू राहील

कोकण किनारपट्टी आणि नाशिकच्या काही भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता डख यांनी व्यक्त केली आहे.

पंजाब डख ; जुलै महिन्यात पाऊस कसा ?

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगल्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मात्र 07 जूलैपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात फक्त तुरळक भागातच पाऊस होईल

हवामानात अचानक बदल झाल्यास, तातडीने माहिती दिली जाईल असे पंजाबरावांनी सांगितले

Leave a Comment