पिकविमा वाटप सुरू, पहा तुमचा पिकविमा जमा झाला का ?

पिकविमा वाटप सुरू, पहा तुमचा पिकविमा जमा झाला का ?

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आणि अजूनही पिकविम्याच्या प्रतीक्षेत आसलेल्या शेतकऱ्यांसाठी पिकविमा कंपन्याकडून पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी हरभरा आणि कांदा पिकांच्या नुकसानीचे दावे केले होते, त्या मंजूर दाव्यांची रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये जमा केली जात आहे…

तुमचा पीक विमा मंजूर जमा झाला का..किती रूपये जमा झाले,… जमा झाला नसेल तर जमा होनार का, पिकविमा मंजूर झाला का हे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये चेक करू शकता…तर मोबाईल मध्ये पिक विमा कास चेक करायचा सविस्तर पाहुया

पिकविमा जमा झाला का असे पहा मोबाईलवर

■ सर्वप्रथम PMFBY पोर्टलवर जा.

■ फार्मर कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक करा.

■ येथे तुम्हाला शेतकरी लॉगिन किंवा गेस्ट लॉगिनचा पर्याय मिळेल.

■ जर तुमचे रजिस्ट्रेशन नसेल, तर तुम्ही गेस्ट लॉगिनद्वारे तुमच्या बँक खात्याची माहिती भरून पॉलिसीची स्थिती जाणून घेऊ शकता.

■ जर रजीस्ट्रेशन आसेल तर शेतकरी लाँगीन वर क्लिक करा

■ लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला वर्ष आणि हंगाम (उदा. खरीप 2024, रबी 2024) निवडता येईल.

■ त्यानंतर तुमच्या पॉलिसी नंबरनुसार पिके आणि मंजूर झालेली रक्कम, तसेच वितरणाची स्थिती (वितरित झाले असल्यास किंवा बाकी असल्यास) दाखवली जाईल.

■ जर तुमचा पीक विमा मंजूर नसेल, तर तुम्हाला 00′ दाखवलं जाईल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पिक-विमा जमा झाला का, कोनत्या खात्यात जमा झाला, किती पैसे आले, कोनत्या पिकासाठी किती रूपये आले, आणि किती तारखेला आले हि सर्व माहिती पाहू शकता…

Leave a Comment