पंचायत समिती योजना अर्ज सुरू, पहा संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया

पंचायत समिती योजना अर्ज सुरू, पहा संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया

पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पोस्टमध्ये आपण या योजनांची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे, आणि शेवटची तारीख याबाबत पाहुयात.

 

पंचायत समिती अंतर्गत अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यापैकी शेतीसंबंधीत काही प्रमुख योजना आपण पाहू..

शेती अवजारे अनुदान योजना, ट्रॅक्टर, नांगरणी यंत्र, पेरणी यंत्र यांसारख्या आधुनिक शेती अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान….

सिंचन सुविधा योजना, विहीर खोदकाम, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासाठी आर्थिक मदत.
चांगल्या प्रतीचे बी-बियाणे आणि खते कमी दरात उपलब्ध करून देणे….

गाई, म्हशी यांसारख्या दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी अनुदान….कुक्कुटपालन आणि शेळीपालन या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत आणि प्रशिक्षण.

 

पंचायत समीती योजना ; आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, जातीचा दाखला (लागू असल्यास), उत्पन्नाचा दाखला, ७/१२ उतारा आणि ८ अ (शेतकऱ्यांसाठी), पासपोर्ट आकाराचे फोटो.

■ अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ते 15 जुलै आहे.

अर्ज कुठे जमा करावा?

भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पंचायत समिती कार्यालयात जमा करा.काही योजनांचे अर्ज आँनलाईनही भरता येतात.

Leave a Comment