July havaman andaj ; जूलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
July havaman andaj ; भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी ३० जून रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, जुलैमध्ये देशात सरासरीच्या १०६% पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाची शक्यता आहे.
मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील काही भागात जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या, मात्र आता जुलैमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
July havaman andaj ; जूलै महिन्यात पाऊस कसा ?
देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. ईशान्य भारत, पूर्व भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सध्या तटस्थ असून, एल-निनो किंवा ला-निना यापैकी कोणतीही स्थिती नाही. ही तटस्थ स्थिती हिवाळ्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. इंडियन ओशन डायपोल (IOD) देखील सध्या तटस्थ आहे, परंतु मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात तो ऋण (निगेटिव्ह) स्थितीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यावर्षी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेगवान प्रवासामुळे जून महिन्यातच मॉन्सून देशभरात पोहोचला. जूनमध्ये देशात सरासरी १६५.३ मिलिमीटर पाऊस पडतो, परंतु यावर्षी १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीच्या १०९% आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर दिल्ली, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सरासरीइतका (१०६%) पाऊस झाला आहे.
जूलैमध्ये महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.