भांडी वाटप योजना ; बांधकाम कामगारांसाठी भांडीवाटप योजना पुन्हा सुरू

भांडी वाटप योजना ; बांधकाम कामगारांसाठी भांडीवाटप योजना पुन्हा सुरू

भांडी वाटप योजना ; महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाने बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची भांडीवाटप योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेला मिळालेली तात्पुरती स्थगिती आता उठवण्यात आली असून, सुधारित कार्यपद्धतीनुसार गृहोपयोगी वस्तूंचे संच पात्र कामगारांना वितरित केले जानार आहेत.

भांडी वाटप योजनेचे ; अर्ज सुरू

1 जुलै 2025 पासून hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. कामगारांना या पोर्टलवर जाऊन आपली माहिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे….

भांडी वाटप योजना ; भांडी वितरण कधी ?

● नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, 15 जुलै 2025 पासून प्रत्यक्ष भांडी वाटपाला सुरुवात होईल.

● राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

● कामगारांना त्यांच्या नोंदणीकृत जिल्ह्यातील केंद्रातूनच गृहोपयोगी वस्तूंचा संच मिळनार आहे.

● केवळ नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारच या योजनेसाठी पात्र असतील.

● ज्या कामगारांची नोंदणी निष्क्रिय झाली आहे किंवा ज्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला आहे, ते अपात्र आसुन त्यांना पुन्हा लाभ घेता येनार नाही.

● प्रत्येक कुटुंबाला (पती किंवा पत्नी) केवळ एकदाच या संचाचा लाभ घेता येनार आहे.

● पात्र कामगारांना त्यांच्या सोयीनुसार दिनांक आणि वितरण केंद्र निवडून ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागेल…यामुळे केंद्रांवर गर्दी टाळता येईल आणि वितरण प्रक्रिया करने सोपे होईल.

भांडी वाटप योजना ; आवश्यक कागदपत्रे

भांडी संच घेण्यासाठी कामगारांनी अपॉइंटमेंट लेटर, आधार कार्ड आणि मंडळाचे ओळखपत्र ही कागदपत्रे सोबत घेऊन दिलेल्या तारखेला केंद्रावर उपस्थित राहावे लागनार आहे. ही संपूर्ण वितरण प्रक्रिया ऑनलाइन आणि पूर्णपणे विनामूल्य असेल.कोणत्याही प्रकारच्या शुल्काची किंवा लाचेची मागणी केल्यास संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई केली जानार आहे.

Leave a Comment