डॉ. रामचंद्र साबळे ; या आठवड्यात पाऊस कसा, संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज
डॉ. रामचंद्र साबळे यांनी ५ जुलैपर्यंत हवामान कसे राहील, महाराष्ट्रातील सर्व विभागातील हवामानाचा अंदाज दिला आहे.रामचंद्र साबळे यांनी दिलेला हवामानाचा अंदाज सविस्तर पाहुयात..
डॉ. रामचंद्र साबळे ; ०५ जूलैपर्यंत पाऊस कमीच
पुढील तीन दिवस म्हनजेच ०५ जूलैपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १०२ हेक्टापास्कल, तर दक्षिणेकडील भागावर १००४ हेक्टापास्कल हवेचा दाब राहील,त्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमीच राहन्याची शक्यता रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.रामचंद्र साबळे यांच्या माहितीनुसार हवेचे दाब १००० हेप्टापास्कल पेक्षा जास्त जेव्हा होतात तेव्हा पावसाचे प्रमाण कमी होते,जेव्हा हवेचे दाब १००० पेक्षा कमी होतात तेव्हा मुसळधार पाऊस पडतात.
०५ जूलैपर्यंत असा राहील पाऊस
दक्षिण व उत्तर कोकण: मध्यम ते जोरदार स्वरूपात ४० ते ६६ मिलिमीटर पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत हलक्या स्वरूपात ४ ते १० मिलिमीटर पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा : १ ते ७ मिलिमीटर अत्यंत हलक्या ते हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे.
पश्चिम, मध्य व पूर्व विदर्भ : ३ ते १५ मिलिमीटर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र : २ ते १२ मिलिमीटर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी हवामान विषयक शिक्षित होणे गरजेचे आहे, कारण हवामान बदलामुळे शेती व्यवस्थापनावर मोठे परिणाम होत आहेत असेही रामचंद्र साबळे म्हनाले.
सविस्तर अंदाज पाहन्यासाठी रामचंद्र साबळे यांचा youtube video पहा