Nuksan bharpai update ; अतीव्रूष्टीची नुकसान भरपाई येनार खात्यात

Nuksan bharpai update ; अतीव्रूष्टीची नुकसान भरपाई येनार खात्यात

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी… राज्य सरकारने अखेर अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानभरपाईचे वितरण सुरू आहे. २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आता शेतकऱ्यांना दिली जानार आहे.

Nuksan bharpai update

विशेष म्हनजे पश्चिम विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येच त्यांची केवायसी (KYC) पूर्ण केली होती, तरीही त्यांना भरपाई मिळाली नव्हती . गेल्या दोन महिन्यांपासून पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भरपाईची स्थिती पाहता येत नव्हती मात्र आता हे पोर्टल पुन्हा सुरू झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना हि मदत लवकरच मिळनार आहे.

आत्तापर्यंत, ४४५ कोटी पैकी २०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्यासाठी २४५ कोटी रुपये अजूनही वितरित करने बाकी आहेत.

कोणत्या जिल्ह्यांना मिळणार मदत?

यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांमधील मोठ्या संख्येने शेतकरी या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, सातारा, सांगली, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिक मधील शेतकऱ्यांना ही अतीव्रूष्टीची भरपाई मिळनार आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात ७५,००० हेक्टर फळबागा आणि उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी २१३ कोटी रुपयांची भरपाई लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment