विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025: आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मदतीचा हात
महाराष्ट्र शासनाने आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025’ जाहीर केली आहे. या योजनेमुळे वारीदरम्यान अपघात किंवा दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास वारकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जानार आहे.
विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 ; योजनेचा लाभ कोनाला मिळनार?
ही योजना 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत पंढरपूरला आषाढी वारीसाठी पायी, खासगी किंवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आसनार आहे…
या योजनेअंतर्गत, अपघातात किंवा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्यास, मृताच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये दिले जानार आहेत तर वारीदरम्यान 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास 74 हजार रूपये आणि 60 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास 2 लाख 50 हजार रुपये दिले जानार आहेत.
सोबतच एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस रुग्णालयात उपचारासाठी राहिल्यास 16 हजार रुपये तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास 5 हजार 400 रुपये मदत वारकऱ्यांना दिली जानार आहे.
आज या जिल्ह्यात होनार मुसळधार – येथे पहा
विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 ; मदत मिळवण्यासाठी काय करावे ?
या योजनेच्या मदतीचा दावा करण्यासाठी, वारकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागनार आहे.अर्जासोबत, संबंधित वारकरी आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला गेले होते, याबद्दल तहसीलदारांचे प्रमाणपत्र दाखवावे लागनार आहे. सर्व तहसीलदार, वारकरी यात्रेसाठी गेले होते याची खात्री करून, मागणीनुसार असे प्रमाणपत्र देतील अशा प्रकारची हि योजना आहे.
अंदाज हवामानाचा ; राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम, आज या जिल्ह्यात पाऊस