Panjab dakh live ; विदर्भ मराठवाड्यातील या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होनार

Panjab dakh live ; विदर्भ मराठवाड्यातील या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होनार

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी राज्यात या आठवड्यात पाऊस कसा राहील, राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात कधी होईल, तसेच राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये या आठवड्यात पावसाची शक्‍यता आहे याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

Panjab dakh live

पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ०६ आणि ०७ जुलै रोजी पूर्व विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भात ही तुरळक ठिकाणी चांगला पाऊस होईल. मराठवाड्यातही बहुतांश जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस या 6 आणि 7 तारखेला होईल मात्र हा पाऊस सर्व दूर नसेल काही ठिकाणी चांगला होईल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होईल तर काही भाग यामध्ये सुटेल अशी माहिती डख यांनी दिली आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, तसेच विदर्भातील वर्धा,अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस होणार आहे.(हा पाऊस सर्वदूर नसेल – पंजाब डख) मराठवाड्यातील नांदेड, परभणी या जिल्ह्यातही चांगला पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर जालना बीड, परभणी तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये ही सहा आणि सात तारखेला पाऊस पडण्याची शक्यता पंजाब डख त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात 10 जुलै पर्यंत भाग बदलत विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल. सोबतच कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार आहे. पाऊस फक्त कमी असलेले जिल्हे लातूर, धाराशिव त्यानंतर सोलापूर, अहिल्यनगर त्यानंतर सांगली साताराचा काही भाग कमी पाऊस होणार आहे अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

राज्यात 13 ते 27 जूलै मात्र चांगला पाऊस पडन्याची शक्यता आहे, जूलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज 👉येथे पहा👈

Leave a Comment