पिकविमा 2025 ; मोबाईलवरून पिकविमा कसा भरायचा, पहा सविस्तर
पिकविमा 2025 ; खरीप हंगाम २०२५ साठी पिकविमा भरन्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पिक विमा (Crop Insurance) अर्ज मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखातून पाहुया, हा अर्ज साधारणपणे दहा मिनिटांत भरता येतो.
नमो शेतकरीचा हप्ता कधी येनार, जानून घ्या👇👇
पिकविमा 2025 ; पिकविमा मोबाईल वरुन असा भरा
तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर उघडुन “पीक विमा” असे शोधून शासनाचे अधिकृत ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा.
इन्स्टॉल केलेले ॲप्लिकेशन उघडुन “लॉगिन” बटणावर क्लिक करा.
मागील वर्षीच्या फॉर्मसाठी वापरलेला मोबाईल नंबर टाका आणि “ओटीपी सह लॉगिन करा” वर क्लिक करा.
मिळालेला ओटीपी टाका, जर माहिती आपोआप भरली गेली नाही, तर तुम्हाला शेतकऱ्याचा तपशील स्वतः भरावा लागेल.
फॉर्म सुरू करण्यासाठी “पीएमएफबीवाय विमा” बॉक्सवर क्लिक करा.त्यानंतर राज्य म्हणून महाराष्ट्र, हंगाम म्हणून खरीप, योजना म्हणून पी.एम.एफ.बी.वाय आणि वर्ष म्हणून २०२५ निवडा, त्यानंतर “सबमिट करा आणि पुढे” वर क्लिक करा.
जर तुम्ही यापूर्वी फॉर्म भरला असेल, तर तुमचे बँक खाते दिसेल. ते निवडा आणि “सेव्ह करा आणि पुढे” वर क्लिक करा. आवश्यक असल्यास तुम्ही नवीन बँक खाते देखील जोडू शकता.
पासबुकवर असलेल्या नावानुसार शेतकऱ्याचे नाव प्रविष्ट करा.आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर शक्यतो आपोआप भरले जातील.
नातेवाईकाचे नाव, मुलगा/मुलगी आणि वय प्रविष्ट करा. मागील वर्षीचा डेटा उपलब्ध असल्यास, ही माहिती आपोआप भरली जाऊ शकते.
लिंग (पुरुष/स्त्री) आणि जात प्रवर्ग (एससी, एसटी, सामान्य, ओबीसी) निवडा.
जर तुमचे नाव ७/१२ उताऱ्यावर असेल तर “मालक”, जर तुम्ही लागवडीसाठी जमीन दिली असेल तर “शेअर क्रॉपपर”, किंवा जर तुम्ही जमीन भाड्याने घेतली असेल तर “भाडेकरू” निवडा.
तुमच्या शेतीच्या प्रमाणानुसार “शेतकरी प्रकार” (लहान, इतर, अल्पभूधारक) निवडा.
Imd havaman ; पुढील 4 आठवडे राज्यात पाऊस कसा ? जूलै शेतकऱ्यांची चिंता वाढवनार
तुमच्या आधार कार्डनुसार तुमचा सध्याचा पत्ता, पिन कोड, राज्य, जिल्हा, उप-जिल्हा (तालुका) आणि ग्रामपंचायत हि माहिती भरा.
वारसदाराच्या तपशील बॉक्सवर टिक करा, त्यानंतर वारसदाराचे नाव, नाते (मुलगा, मुलगी, पत्नी) आणि वय प्रविष्ट करा, त्यानंतर “सेव्ह करा आणि पुढे” वर क्लिक करा.
तुमचे शेत ज्या जिल्ह्यात, तालुक्यात, महसूल मंडळात आणि ग्रामपंचायतीत आहे ते निवडा आणि”पुढे जा” वर क्लिक करा.
तुम्ही लागवड केलेले विशिष्ट पीक निवडा..पेरणीची तारीख टाका…मालकी” निवडा उदा.मालक, शेअर क्रॉपपर किंवा भाडेकरू
तुमच्या ७/१२ उताऱ्यावरील सर्वेक्षण क्रमांक (गट क्रमांक) आणि तुमच्या ८अ उताऱ्यावरील खाते क्रमांक टाका आणि “पुढे जा” वर क्लिक करा.
तुम्ही पीक लागवड करत असलेल्या क्षेत्राचे (हेक्टर किंवा आर मध्ये) क्षेत्र टाका त्यानंतर भरण्याची प्रीमियम रक्कम आणि विमा रक्कम (भरपाईची रक्कम) प्रदर्शित केली जाईल…..”पुढे जा” वर क्लिक करा.
आणखी पिके जोडण्यासाठी, “आणखी पीक जोडा” वर क्लिक करा आणि पीक तपशील प्रक्रिया पुन्हा करा..
तुमच्या बँक पासबुक किंवा चेकबुकचा फोटो किंवा पीडीएफ अपलोड करा. २) तुमच्या ७/१२ आणि ८अ उताऱ्यांची पीडीएफ अपलोड करा…३) पीक पेरणीसाठी स्वयं-घोषणापत्र अपलोड करा (पीक पेरा)… संयुक्त जमीन मालकीसाठी, सर्व मालकांच्या स्वाक्षऱ्या…माहिती भरल्यानंतर”सबमिट करा” वर क्लिक करा.
सबमिट केल्यानंतर, तुमचा पॉलिसी क्रमांक तयार होईल आणि तुम्हाला भरायची असलेली रक्कम दिसेल. भरणा करण्यासाठी पुढे जा वर क्लिक करा.
यशस्वी भरणा झाल्यानंतर, तुम्ही होम पेजवरील “माझी पॉलिसी” अंतर्गत महाराष्ट्र, हंगाम, योजना आणि वर्ष निवडून तुमच्या पॉलिसीची स्थिती तपासू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही पिकविमा मोबाईलवरून भरू शकता, हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेयर करा...