8 जूलै हवामान अंदाज ; आजही या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट…
पुढील 24 तासात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, तसेच कोकण आणि घाटमाथ्यावरील काही मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…तर आज कोनत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट आहे पाहुयात सविस्तर..
विदर्भ ; विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधारेचा आँरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय तर अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.. बुलढाणा अकोला वाशीम हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता..
मराठवाडा ; नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बिड, छ.संभाजीनगर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय तर लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र ; नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव काही ठिकाणी मुसळधार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे..
मध्य & दक्षिण महाराष्ट्र ; अहिल्यानगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे तर पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरीभागात मुसळधारेचा यल्लो अलर्ट कायम आहे..
कोकण ; कोकणातील सर्वच जिल्ह्यात मुसळधारेचा यल्लो अलर्ट कायम आहे..
असआच दररोजचा हवामान अंदाज, शेतीविषयक योजना, क्रुषी बातम्या, बाजारभावाच्या माहीतीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमधे सामील व्हा आणि तुमच्या ईतर शेतकरी बांधवांना ग्रुपमधे समाविष्ट करा, हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेयर करा.