10 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

10 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

पुढील काही तासात विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोनकोनत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कुठे हलक्या ते मध्यम पावसाचा अलर्ट आहे पाहुयात सविस्तर (सर्व जिल्ह्यांचा हवामान अंदाज विभागानुसार)

10 जूलै हवामान अंदाज

विदर्भ ;
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, आणि अमरावती या जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी अतीमुसळधारेचा आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वर्धा, यवतमाळ, अकोला,वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिलाय..

मराठवाडा ;
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर लातूर, धाराशिव, बिड, छ.संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र/कोकण
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कोनताही अलर्ट नाही, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडुन व्यक्त करण्यात आली आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावरील भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

10 जूलै हवामान अंदाज

पुढील 5 दिवसाचा अंदाज

उद्याही (11 जूलै) संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस उघडनार आहे..12 जूलैपासून संपूर्ण राज्यातील पाऊस विश्रांती घेईल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे

दररोजचा हवामान खात्याने दिलेला अंदाज पाहन्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपमधे सामील व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेयर करा..

रामचंद्र साबळे Live ; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पाऊस कमी होन्याची शक्यता

Leave a Comment