Ladki bahin new update ; लाडकीचे लाड बंद, या महीलांना योजनेचा लाभ मिळनार नाही
लाडकी बहीण योजनेतून अनेक महीलांना अपात्र ठरवन्यात आलं आसून अजूनही निकषात न बसनार्या महिलांचा हप्ता बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का, योजनेचे निकष काय आपल्या पाहुयात…
लाडक्या बहीणींनो KYC करावी लागनार ? पहा सविस्तर👇
Ladki bahin new update ; लाडकीचे लाड बंद…
◆ कौटुंबिक वार्षिक उत्पन्न
ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
आयकर भरणारे कुटुंब ;
जर कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल किंवा नियमितपणे आयकर रिटर्न (ITR) दाखल करत असेल, तर त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.
सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक कुटुंब ;
ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये नियमित कर्मचारी म्हणून काम करत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन (पेन्शन) घेणाऱ्या कुटुंबातील महिलांनाही हप्ता मिळणार नाही.
अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले खाजगी यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवक कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे योजनेसाठी पात्र मानले जातील, कारण त्यांचे उत्पन्न मर्यादेत आहे आणि त्यांची नोकरीची स्थिती नियमित सरकारी कर्मचाऱ्यांसारखी नाही.
इतर आर्थिक योजनांचा लाभ:
जर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही आर्थिक योजनेचा दरमहा दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, तर त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता मिळणार नाही. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना यांसारख्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा दुहेरी लाभ मिळणार नाही. मात्र, ज्या महिला पीएम किसान योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना फक्त ५०० रुपये मिळतील, कारण ती रक्कम दीड हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
राजकीय सदस्य:
ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही. हे राजकीय पदांवरील व्यक्तींना योजनेतून वगळण्यासाठी आहे.
ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत, त्या कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
चारचाकी वाहन: ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे (ट्रॅक्टर वगळून), त्या कुटुंबातील कोणत्याही महिलेला या योजनेचा हप्ता मिळणार नाही, जरी ते वाहन कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या नावावर असले तरीही…
या सर्व कारणामुळे अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे आणि यानंतर अजुनही अपात्र महिलांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे जर तुम्ही अपात्र असुनही तुम्हाला हप्ता मिळत आसेल तर तुमचा हप्ता कधीही बंद पडु शकतो.
मोफत गॅस सिलेंडर अनुदान कधी मिळणार?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ; मोफत गॅस सिलेंडर अनुदान कधी मिळणार?