sim card ; तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत तपासा, हरवलेल्या नंबर ला बंद करा.

sim card ; तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत तपासा, हरवलेल्या नंबर ला बंद करा.

भारत सरकारने नुकतेच ‘संचार साथी’ नावाचे एक नवीन ॲप सुरू केले आहे, या अँपमधून तुम्ही तुमच्या नावावर किती सिमकार्ड नोंदणीकृत आहेत हे पाहू शकता आणि वापरत नसलेल्या किंवा हरवलेल्या नंबर ला बंद करू शकता.अनेकदा असं होतं की, आपल्या नकळत आपल्या नावावर अनेक सिम कार्ड नोंदणीकृत असतात, ज्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. संचार साथी ॲपमुळे तुम्ही तुमच्या नावावर असलेल्या आणि सध्या वापरत नसलेल्या अनधिकृत नंबरना पाहू शकता आणि त्यांना अँपमधूनच ब्लॉक करू शकता.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पाऊस घेनार विश्रांती – सविस्तर पहा 

सर्वप्रथम संचार साथी ॲप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.

ओपन करून ॲपमध्ये नोंदणी करा आणि लॉग इन करा. मोबाईल नंबर टाकून otp टाका आणि लाँगीन होईल.

 

एकदा तुम्ही लॉग इन केल्यावर, संचार साथी ॲप तुमच्या आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्रावर नोंदणीकृत असलेल्या सर्व मोबाइल नंबरची [sim card] यादी दाखवेल….

यादीतील जो नंबर तुम्ही वापरत नाही किंवा जो नंबर तुमच्या परवानगीशिवाय नोंदणीकृत आहे असे तुम्हाला वाटते, तो नंबर निवडा. त्या नंबरसमोर ‘Block’ किंवा ‘Report’ असा पर्याय दिसेल….

तुम्ही निवडलेल्या नंबरच्या पुढे Block किंवा Report पर्यायावर क्लिक करा.

नंबरला ब्लॉक करण्याचे कारण विचारू मध्ये हा माझा नंबर नाही किंवा मी हा नंबर वापरत नाही किंवा ईतर योग्य पर्याय निवडा….

तुमचे कारण निवडल्यानंतर, विनंती सबमिट करा.

सबमीट केल्यानंतर तुम्हाला एक ट्रॅकिंग आयडी दिला जाईल. हा आयडी जपून ठेवा, कारण याच्या मदतीने तुम्ही तुमच्या विनंतीची स्थिती तपासू शकता.

या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या नावावर असलेल्या वापरत नसलेल्या, हरवलेल्या किंवा अनावश्यक मोबाइल नंबरना सहजपणे ब्लॉक करू शकता आणि या नंबरच्या होनार गैरवापराला आळा चालू शकता.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पाऊस घेनार विश्रांती – सविस्तर पहा 

Leave a Comment