Kharip pikvima ; पिकविमा भरत असाल तर, हे जानून घ्या नुकसान वाचेल
2025 च्या खरीप हंगामापासून 1 रुपयाची पीक विमा योजना बंद करून सुधारित पीक विमा योजना लागू केली जात आहे. या नवीन योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याचा हप्ता भरावा लागत आहे. तसेच अजूनही काही महत्त्वाचे बदल योजनेत करण्यात आलेले आहे जे शेतकऱ्यांना माहिती आसने आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड, फार्मर आयडी बाद करण्यात येनार आसून पुढील 5 वर्षे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येनार नाही, त्यामुळे खालील माहिती सविस्तर वाचा..
तुमच्या गावाचे नाव पोकराच्या यादीत आहे का ? – 👉येथे पहा
2024 च्या खरीप आणि रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात बोगस पीक विमा पॉलिसी आढळल्यामुळे, शासनाने 2025 मध्ये असे प्रकार टाळण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. बोगस पॉलिसी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जानार आहे.
ई-पीक पाहणी आणि पीक विमा तफावत नसावी
जर ई-पीक पाहणीमधील पीक आणि प्रत्यक्षात भरलेल्या पीक विम्यामध्ये तफावत आढळल्यास, ती पॉलिसी बोगस मानली जाईल आणि तात्काळ रद्द केली जानार आहे.
तुमच्या गावाचे नाव पोकराच्या यादीत आहे का ? – 👉येथे पहा
Kharip pikvima ; असे आढळल्यास शेतकऱ्यांवर होणारी कारवाई
देवस्थान जमीन किंवा इतर सामायिक जमिनींवर चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधित शेतकऱ्यांना ब्लॅकलिस्ट केले जानार आहे.
बोगस पॉलिसी तयार करणाऱ्या किंवा बोगस पीक विम्याचे प्रकरण करणाऱ्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आणि आधार कार्ड पुढील पाच वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केले जाऊन कोणत्याही योजनेचा ला त्या शेतकऱ्याला घेता येनार नाही.
तुमच्या गावाचे नाव पोकराच्या यादीत आहे का ? – 👉येथे पहा
अशा शेतकऱ्यांना पुढील काळात कोणत्याही कृषी योजना, पीक विमा किंवा अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात लावलेल्या पिकाचाच पीक विमा भरावा. पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. ई-पीक पाहणीमध्ये ज्या पिकाचा पिकविमा भरला आहे त्याच पिकाची नोंद करावी, कारण ई-पीक पाहणीचा डेटा फार्मर आयडीशी जोडला जानार आसून सर्व योजनांसाठी वापरला जानार आहे.
तुमच्या गावाचे नाव पोकराच्या यादीत आहे का ? – 👉येथे पहा
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कधी, पहा सविस्तर