Ration card news ; मुदत संपली, आता हे रेशनकार्ड ठरनार बोगस – धान्यही बंद

Ration card news ; मुदत संपली, आता हे रेशनकार्ड ठरनार बोगस – धान्यही बंद

रेशन धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानात ई-केवायसीची प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाद्वारे वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे असे असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात काही लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने या लाभार्थ्यांना धान्यापासूनच वंचित रहावे लागणार आहे…

 

रेशन दुकानात ई-पॉस मशीनवर ही प्रक्रिया केली जाते. अपात्र नागरीकांकडून रेशन धान्याचा लाभ घेतला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले होते. मागील वर्षभरापासून रेशन दुकानांमध्ये ही प्रक्रिया केली जात आहे. शासनाच्या स्वस्त धान्याचा लाभ अपात्र व्यक्तींना मिळू नये, यासाठी ई-केवायसीची ही प्रक्रिया केली जात आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशनकार्ड बाद करून धान्य बंद केले जानार आहे.

 

Ration card news असे कराल शिधापत्रिका होणार रद्द

शासनाद्वारे मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. हे रेशनचे धान्य बाजारात विकणाऱ्यावर आणि संबंधीत रेशनदुकानदारावर कारवाई केली जाणार आहे. तसेच त्या लाभार्थ्याची शिधापत्रिकाही रद्द करण्यात येणार आहे.

 

केवायसी न केल्यास ते लाभार्थी ठरणार बोगस,धान्य बंद

रेशनकार्डवर धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्यास त्यांचे नाव रेशनकार्डवरून रद्द करण्यात येणार आहे. तसेच त्या लाभार्थ्याला धान्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

शासनाने ‘ई-केवायसी’ करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. मात्र रेशन दुकानात ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरुच आहे. ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरु राहणार, याचा निर्णय शासनस्तरावर लवकरच घेतला जाणार आहे. अशी माहिती आबासाहेब पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.

Leave a Comment