Panjab dakh havaman andaj ; राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात कधी ?

Panjab dakh havaman andaj ; राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात कधी ?

17 जुलै नंतर राज्यातील वाऱ्याचा वेग कमी होनार आहे आणि 20 जुलै नंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. परभणी, लातूर, बीड, धाराशिव यांसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये 16, 17, 18 आणि 19 जुलै रोजी भाग बदलत पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

17 जुलै नंतर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पाऊस सक्रिय होनार आहे, याचाच प्रभाव म्हणून महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये, जसे की लातूर, अक्कलकोट, सोलापूर, जत तालुका, धाराशिव, बीड आणि परभणी, येथे 18 जुलै नंतर पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. हा पाऊस खूप मोठा नसेल, परंतु पिकांना जीवदान देणारा ठरेल. काही ठिकाणी 10-20 मिनिटे किंवा अर्धा तासाचा हा पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

Panjab dakh havaman andaj जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मोठा पाऊस..

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होनार आहे. हा पाऊस पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात तसेच मराठवाड्यातही पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात धो धो पाऊस

ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल, सरासरीपेक्षा जास्त पाऊस होनार आहे. यामुळे राज्यातील बऱ्याच धरणं भरनार आहेत असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर व्हिडीओ पहा – https://youtu.be/-flM80ksRoc?si=1opIbf2f5v6rNEES

Leave a Comment