पंजाब डख हवामान अपडेट ; 17 ते 21 जूलैदरम्यान या जिल्ह्यात मुसळधार

पंजाब डख हवामान अपडेट ; 17 ते 21 जूलैदरम्यान या जिल्ह्यात मुसळधार

हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 17 जुलै ते 21 जुलै दरम्यान राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस होणार आहे याबद्दलचा सविस्तर असा पंजाबराव डक यांनी दिलेला अंदाज आपण या लेखातून सविस्तर पाहूयात…

 

पंजाबराव डक यांनी काल 16 जुलै रोजी दिलेला अंदाज हा अगदी तंतोतंत खरा ठरला असून कालच्या अंदाजामध्ये त्यांनी सांगितलं होतं की, ज्या ठिकाणी आभाळ तांबडे होईल त्या ठिकाणी येत्या 72 तासांमध्ये चांगला पाऊस होईल. आणि त्याच पद्धतीने जालना असेल त्यानंतर परभणी, लातूर, नांदेड,धाराशिव तसेच राज्यातील ईतर काही भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी नद्यांना पुर आल्याचं पहायला मिळालं.

पंजाब डख हवामान अपडेट ; 17 ते 21 जूलै

ज्या भागांमध्ये अजूनही पाऊस झालेला नाही त्या भागात 17 18 19 20 आणि 21 जुलैला चांगला पाऊस होईल आणि पिकांना जीवदान मिळेल अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे.

राज्यात 17 जुलै ते 21 जुलै दरम्यान ठीक ठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. यामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर त्यानंतर अहिल्यानगरचा काही भाग या भागामध्ये हा पाऊस चांगला बरसणार आहे. तसेच राज्यातील इतर भागांमध्ये ही 17 ते 21 जुलै दरम्यान चांगला पाऊस होईल असा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment