Pm kisan yojana new update ; शेतकऱ्यांना शासनाकडून महत्त्वाची सुचना
Pm kisan च्या अधिक्रत वेबसाईटवरून शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तर 20 व्या हप्त्याची अपडेट आणि वेबसाईटवर देण्यात आलेल्या सुचना काय आहेत पाहुयात सविस्तर…
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, जी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात, ज्यामुळे त्यांना शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यास मदत होते. मात्र, या योजनेच्या नावाखाली काही फसवणूक करणारे लोक सक्रिय झाले आहेत, जे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांनी सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे….
लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण ; या महिला अपात्र
Pm kisan yojana new update
सध्या सोशल मीडियावर पीएम किसान योजनेशी संबंधित अनेक खोट्या बातम्या आणि संदेश फिरत आहेत. अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा अज्ञात ॲप्स इन्स्टॉल करणे टाळा. यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते आणि तुमचे बँक खाते हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पीएम किसान योजनेबद्दलची कोणतीही माहिती हवी असल्यास, केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा. योजनेची अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in ही माहितीचा सर्वात विश्वसनीय स्रोत आहे. याव्यतिरिक्त, सरकारची अधिकृत सोशल मीडिया पेजेस आणि स्थानिक कृषी विभागाचे अधिकारी तुम्हाला योग्य माहिती देऊ शकतात. अनोळखी कॉल किंवा मेसेजद्वारे विचारलेली कोणतीही वैयक्तिक माहिती, जसे की आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, किंवा ओटीपी (OTP) कधीही कोनाला देऊ नका.
राज्यात पुन्हा पावसाचं कमबँक ; पंजाब डख
Pm kisan ; 20 व्या हप्त्याची सद्यस्थिती
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता 18 तारखेला येणे अपेक्षित होते, परंतु तो अद्याप जमा झालेला नाही. पण, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, हा हप्ता याच महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच हप्ता जमा होण्याची निश्चित तारीख जाहीर केली जाईल. त्यामुळे, शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासत राहावे….
लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण ; या महिला अपात्र
लाडकी बहीण योजना ; लाखो महिला अपात्र, तुम्हाला मिळनार का पुढील हप्ता