रासायनिक खताला 100% अनुदान, या शेतकऱ्यांना मिळनार लाभ
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेला 2025-26 मध्ये राबवण्यासाठी राज्य शासनाने 18 जुलै 2025 रोजी मंजुरी दिली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी 104 कोटी 50 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. 21 सप्टेंबर 2023 रोजी योजनेत काही बदल करण्यात आले होते, ज्यानुसार आता 2025-26 मध्ये याची अंमलबजावणी केली जानार आहे.
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; येथे पहा
या शेतकऱ्यांना मिळनार लाभ
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष आहेत. मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अपात्र असलेले शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी किंवा ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही, असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे, ज्या शेतकऱ्यांना इतर योजनांमधून मदत मिळत नाही, त्यांनाही फळबाग लागवडीसाठी आर्थिक साहाय्य या योजनेतून दिले जाते.
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; येथे पहा
योजनेअंतर्गत रासायनिक खताला 100% अनुदान
या योजनेत खत देण्याची बाब नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामुळे फळबागांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक खतांवरील खर्च वाचनार आहे.
या योजनेत एकूण 19 प्रकारच्या फळबागांच्या लागवडीचा यात समावेश आहे, ज्यात आंबा, काजू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू आणि नारळाच्या विविध जातींचा समावेश आहे.
अनुदान कसे मिळते…?
अनुदानाची रक्कम तीन वर्षांच्या कालावधीत दिली जाते: पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20%. विशेष म्हणजे, खत देण्याच्या बाबीसाठी 100% अनुदान दिले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होतो.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच, योजनेशी संबंधित महत्त्वाचे सरकारी निर्णय (जीआर) maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, जिथे शेतकरी सविस्तर माहिती मिळवू शकतात.