Farmer Id news ; शेतकऱ्यांनो लवकरात लवकर हे काम करा, नाहीतर होईल नुकसान
विविध शासकीय योजना, शासकीय अनुदान तसेच शेतीसंबंधीत कुठल्याही कामासाठी आता Farmer Id ची गरज भासणार आहे..Farmer आयडी काढन्यासाठी काय कागदपत्रे लागतात, फार्मर आयडी काढला नाही तर काय होईल याबाबत सविस्तर माहिती पाहुयात..
Farmer Id साठी लागनारी कागदपत्रे
●आधार कार्ड
●7/12 & ८अ
●आधार लिंक आसलेला मो.नंबर
● मोबाईल नंबर आधार लिंक नसेल तर स्वतः शेतकरी थम देऊन फार्मर आयडी काढु शकतात
Farmer Id कशासाठी ?
सामान्य व्यक्तीची ओळख जसे आधारकार्ड आहे, त्याचप्रमाणे शेतकरी असल्याची ओळख म्हणजे फार्मर Farmer Id आसनार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी तयार करण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
Farmer Id न बनविल्यास काय होईल ?
जर आपण वेळेत आपली फार्मर आय.डी. तयार केली नाही, तर अनेक शासकीय लाभापासून वंचीत रहावे लागनार आहे.
◆ पीएम किसान (PM Kisan) योजनेचा लाभ बंद होतील.
◆ नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाहीत.
◆ पिक विमा भरता येनार नाही आणि मिळणार पण नाही.
◆पिक कर्ज मिळणार नाही.
◆ धान खरेदी तथा बोनस मिळनार नाही.
◆ कृषिविषयक सर्व योजना करिता अर्ज करता येणार नाही.
◆ नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मदत मिळणार नाही
◆ जमीन खरेदी विक्री करता येणार नाही.
◆ कर्ज माफी लाभ घेता येणार नाही.
अशाप्रकारे अनेक लाभाकरिता फार्मर आय.डी ची गरज पडनार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी कोणतेही नुकसान होऊ नये,शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी म्हणून आजच आपली फार्मर आयडी बनवून घ्यावी.