Gharkul योजनेअंतर्गत घर बांधन्यासाठी किती अनुदान किती टप्प्यात मिळते ?

Gharkul योजनेअंतर्गत अनुदान कसे मिळते ?

घरकुल योजनेतील लाभार्थींना घर बांधकामासाठी मिळणारे अनुदान चार हप्त्यांमध्ये वितरित केले जाते. त्यामध्ये…

◆ पहिला हप्ता ₹15,000 चा घराच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी हा पहिला हप्ता दिला जातो. घरकुलाला मंजुरी मिळाल्यावर, लाभार्थीच्या बँक खात्यात ₹15,000 थेट DBT द्वारे जमा केले जातात.

◆ दुसरा हप्ता ₹70,000 चा हा हप्ता ‘जोता पातळी’ (Plinth Level) किंवा घराच्या संरचनेचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यावर दिला जातो. या टप्प्यावर ₹70,000 चे अनुदान लाभार्थींच्या खात्यात हस्तांतरित केले जाते.

◆ तिसरा हप्ता ₹30,000 चा छताची पातळी (Roof Level) पूर्ण झाल्यावर हा तिसरा हप्ता दिला जातो. यामध्ये घराचे छत बसवल्यानंतर ₹30,000 चे अनुदान खात्यात जमा केले जाते.

◆ चौथा हप्ता ₹5,000 रूपयांचा Gharkul बांधकामाची पूर्णता आणि अंतिम तपासणी झाल्यानंतर हा शेवटचा हप्ता दिला जातो. या टप्प्यात ₹5,000 चे अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा केले जातात…

घरकुल योजनेच्या मुख्य अनुदाना व्यतिरिक्त, लाभार्थींना इतर योजनांमधूनही पूरक अनुदान मिळते, ज्यामुळे घराच्या बांधकामाला अधिक मदत मिळते..

कापूस तननाशक/कापूस पिकासाठी तननाशक- सविस्तर वाचा

◆ महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ₹26,730
या योजनेंतर्गत Gharkul लाभार्थ्यांना 90 दिवसांच्या कामासाठी ₹26,730 मिळतात. हे पैसे घर बांधकामासाठी मजूर म्हणून काम केल्याबद्दल दिले जातात…
◆ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाच्या बांधकामासाठी ₹12,000 चे अनुदान दिले जाते.

अशा प्रकारे घरकुल योजनेचे 1 लाख 20 हजार, रोजगार हमीचे 26,730 आणि शौचालयासाठी 12000 असे एकूण 158730 रूपये अनुदान घरकुल बाधन्यासाठी दिले जातात. आता देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या घोषणेनुसार, घरकुल योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना 50000 चे वाढीव अनुदान मिळणार आहे. या बदलामुळे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आता एकूण ₹2,10,000 रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे.

कापूस तननाशक/कापूस पिकासाठी तननाशक- सविस्तर वाचा

Leave a Comment