Havaman ; या आठवड्यात पाऊस कसा, रामचंद्र साबळे हवामान अंदाज

Havaman ; या आठवड्यात पाऊस कसा, रामचंद्र साबळे हवामान अंदाज

Havaman ; जेष्ठ हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी या आठवड्यात पाऊस कसा राहील याचा अंदाज जाहीर केला आहे. रामचंद्र साबळे यांनी दिलेला हवामान अंदाज सविस्तर पाहुयात…

आज ०७ आणि ०८ जूलै महाराष्ट्राच्या उत्तरेस १००४ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे या काळात हलक्या पावसाची शक्यता राहील.

Havaman या तारखेपासून पाऊस वाढनार

बुधवार ते शनिवार ( ९ ते १२ जूलै ) या चार दिवसांत महाराष्ट्राचे उत्तर भागावर १००२ हेप्टयपास्कल व दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब होताच पावसाच्या प्रमाणात वाढ होईल आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण होईल, मात्र हा संपूर्ण आठवडाभर कोकणातील सर्वच जिल्ह्यांत चांगल्या पावसाची शक्यता आहे कोकणात प्रतिदिनी ४० ते ६० मिमी पावसाची शक्यता राहील.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत ६ ते १४ मिमी, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत १ ते ८ मिमी, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ७ ते २० मिमी व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत २ ते १५ मिमी पावसाची शक्यता राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग २२ ते २५ किमी राहील. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा ताशी वेग २२ ते २८ किमी राहील. मराठवाड्यात वाऱ्याचा ताशी वेग २५ ते ३० किमी राहील. जेव्हा वाऱ्याचा ताशी वेग वाढतो, तेव्हा बाष्पीभवनाचा वेगही वाढतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो असे रामचंद्र साबळे म्हनाले.

हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. तसेच प्रशांत महासागराच्या पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १७ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोर जवळ २१ अंश सेल्सिअस इतके कमी राहण्यामुळे तेथे हवेचे दाब अधिक राहतील. त्यामुळे मपूर्ण बाष्प भारताच्या दिशेने येऊन पावसाची शक्यता निर्माण होईल. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता अधिक राहील. खरीप पिकांचे वाढीसाठी हवामान दमट व ढगाळ राहील.(डाँ.रामचंद्र साबळे)

Leave a Comment