Havaman andaj ; या आठवड्यात कसा राहील पाऊस, या जिल्ह्यात मुसळधार

Havaman andaj ; या आठवड्यात कसा राहील पाऊस, या जिल्ह्यात मुसळधार

Havaman andaj ; मान्सून अजून पूर्णपणे पुढे सरकलेला नाही, पण हवामान मान्सून पुढे सरकन्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे तो पुढील दोन दिवसांत विदर्भासह इतर भागांत दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…

हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की पुढील तीन दिवसांत मान्सून छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमधील काही भागांमध्ये दाखल होईल.

Havaman andaj ; पुढील 5 दिवस राज्यातील या जिल्ह्यात पावसाचा अंदाज

कोकण ; सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यात पुढील पाच दिवसांसाठी बहुतेक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करन्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र ; पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडू शकतो. इतर जिल्ह्यांमध्येही आज आणि उद्या जोरदार पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारपासून पावसाचा जोर कमी होईल आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊसही पडू शकतो.

विदर्भ – बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली पुढील पाच दिवसांसाठी काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येल्लो अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे .

मराठवाडा : आज आणि उद्या सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसासाठी ‘येल्लो अलर्ट’ जारी केला आसून रविवारपासून पावसाचा जोर कमी होऊन हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment