havaman andaj today ; पुढील 3-4 दिवस या जिल्ह्यात मध्यम तर ईथे मुसळधार ; रामचंद्र साबळे
havaman andaj today ; रामचंद्र साबळे आज महाराष्ट्रावर 1004 हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील आणि उद्या बारा जून गुरुवारपासून पुढे तो आणखी कमी होऊन 1000 हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील आणि त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पश्चिम मध्य व पूर्व विदर्भात हलक्या स्वरूपात तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार आणि शुक्रवारी व शनिवारी अति जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असून कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात जोराचे पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह मान्सूनचे पुनरागमन होईल आणि मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज रामचंद्र साबळै यांनी व्यक्त केला आहे.
पि एम किसान चा हप्ता कधी येणार – येथे पहा
havaman andaj today ;रामचंद्र साबळे
रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता जून महिन्यातील पावसाचे खंडाचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यामुळे मान्सूनचे पुनरागमन होत आसून पेरणीयोग्य ओल झाल्यास पेरण्या करणे गरजेचे आहे.
हे वर्ष सरासरीपेक्षा अधिक पावसाचं आसनार आहे मात्र यंदाही कमी कालावधीत जास्त पाऊस आणि काही काळ पावसात खंड अशी.परीस्थिती आसनार आहे. जुनमधील खंडाचा कालावधी संपला आहे मात्र जुलैमध्येही खंड पडू शकतो असंही रामचंद्र साबळे यांनी आपल्या अंदाजात सांगितले.