Havaman today ; राज्यात पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज
राज्यातील आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, आणि पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कसे राहील याबाबत हवामान विभागाने दिलेला अंदाज या पोष्टमधून सविस्तर पहुयात..
पुढील काही तासात पुर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केलाय, तसेच मराठवाड्यातील जालना आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ईतर सर्वच जिल्ह्यात तुरळकच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे..
पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात कोणताही अलर्ट नसून तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे..
Havaman today ; पुढील 5 दिवसाचा अंदाज..
राज्यातील सर्वच जिल्ह्यात पुढील 5 दिवस मोठ्या पावसाची शक्यता नसुन तुरळकच ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस अपेक्षित आहे.. बहुतांश भागात पावसाची राहन्याची शक्यता आहे.. विदर्भ आणि कोकणातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील 5 दिवस हलक्या पाऊस होईल मात्र राज्यातील ईतरत्र हवामान कोरडे राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
पुढील 5 दिवसाचा अंदाज(नकाशे)
सोयाबीन ; या तननाशकाचा रिझल्ट आहे एक नंबर.. टाँप 3 तननाशके👇👇