Kapus khat niyojan ; कापूस पिकासाठी संपूर्ण खत व्यवस्थापन…सविस्तर माहिती

Kapus khat niyojan ; कापूस पिकासाठी संपूर्ण खत व्यवस्थापन…सविस्तर माहिती

कापूस हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे, ज्याची मोठ्या क्षेत्रावर लागवड केली जाते. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. या लेखामध्ये आपण कापूस पिकासाठी खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Kapus khat niyojan – कापूस पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्ये

कापूस पिकाला वाढीसाठी विविध अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यामध्ये नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) ही प्रमुख अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात लागतात. याव्यतिरिक्त, गंधक (S), मॅग्नेशियम (Mg) कमी प्रमाणात तळ झिंक, बोरॉन (B) आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये खुप कमी प्रमाणात आवश्यक असतात. ही अन्नद्रव्ये पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यांवर योग्य प्रमाणात दिल्यास उत्पादनात वाढ होते .

नत्राचे प्रमाण जास्त झाल्यास कापसाच्या झाडाची अनावश्यक वाढ होते, ज्यामुळे दोन पात्यांमधील आणि फळफांद्यांमधील अंतर वाढते आणि परिणामी उत्पादन घटते. त्यामुळे कापसाला नत्राचा वापर योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.

Kapus khat niyojan (तीन डोज)

कापूस पिकाला खते टप्प्याटप्प्याने देणे अधिक फायदेशीर ठरते. कारण पावसामुळे खतं जमीनीत खोल जातात किंवा वाहून जात आसतात.. खालीलप्रमाणे विविध डोसमध्ये खतांचे नियोजन करू शकता..

🔷पहिला डोस

◆ प्रति एकर 1 ते 1.5 बॅग 10:26:26 किंवा 12:32:16 वापरावे….जर तुमच्याकडे 20:20:0:13 किंवा 18:46:00 ही खते असतील, तर त्यासोबत ऐकरी 20-25 किलो पोटॅश द्यावे.

🔷दुसरा डोस

◆ पहिल्या डोजप्रमानेच प्रति एकर 1 ते 1.5 बॅग 10:26:26 किंवा 12:32:16 वापरावे….जर तुमच्याकडे 20:20:0:13 किंवा 18:46:00 ही खते असतील, तर त्यासोबत 20-25 किलो पोटॅश द्यावे.

तिसर्या डोजमध्ये वरील खतासोबत मॅग्नेशियम सलफेट प्रति एकर 10 किलो देणे आवश्यक आहे. यामुळे जास्त पावसामुळे येणारा पिवळेपणा आणि पातेगळ कमी होण्यास मदत होते, कापूस शेवटपर्यंत हिरवागार राहतो…

🔷तीसरा डोस: (फुटवे व बोंडे लागण्याच्या वेळेस)

◆युरिया: प्रति एकर 1 ते 1.5 बॅग ◆ मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो….
शेवटच्या खत व्यवस्थापनात स्फुरद आणि पोटँश जमीनीतुन न देता 0.52.34 / 13.00.45 / 00.00.50 यासारख्या विद्राव्य खतांचा वापर फवारणीतुन करावा.

अशा पद्धतीने खत नियोजनामुळे तुम्हाला कापूस पिकाचं अधिक उत्पादन मिळविण्यात मदत होईल.

Leave a Comment