Ladki bahin ; लाडक्या बहीणींनो खातं चेक करा, पैसे जमा व्हायला सुरुवात
Ladki bahin ; राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी निधी वितरित केला आहे. यापूर्वी, १ जुलैपासून महिला लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता वितरित केला जाईल अशी माहिती देण्यात आली होती, परंतु इतर विभागांकडून निधीचे वितरण न झाल्याने हप्त्याचे वितरण थांबले होते.
आता आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी निधी वितरणाला मंजुरी दिली आहे. आदिवासी विकास विभागाने १ जुलै २०२५ रोजी अनुसूचित जमातीच्या महिला लाभार्थ्यांच्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेच्या आदिवासी घटकासाठी एकूण ३२४० कोटी रुपयांची तरतूद असून, जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी ३३५.७० कोटी रुपयांच्या निधीला १ जुलै २०२५ रोजी मंजुरी मिळाली आहे.
लाडकीचा हप्ता २१०० रूपये होनार – पहा सविस्तर
त्याचप्रमाणे, सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांच्या हप्त्यासाठी आवश्यक निधी देखील वितरित केला आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी ३९६० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद आहे. यासाठी ४१०.३० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यामुळे, आता सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गाचा निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीकृत खात्यात जमा झाला आहे. या खात्यातून डीबीटीद्वारे (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) जून महिन्याचे थकीत मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाईल.
Ladki bahin ; जूनचा हप्ता आजपासून वाटप सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलैपासून लाभार्थ्यांच्या खात्यात हे मानधन जमा होण्याची अपेक्षा आहे आणि साधारणतः ७ जुलैपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे १५०० रूपये वितरित केले जातील.
लाडकीचा हप्ता २१०० रूपये होनार – पहा सविस्तर
Gharkul yojana 2025 ; घरकुलाचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा होनार