Ladki bahin news ; पुढील हप्ता मिळवण्यासाठी KYC करावी लागनार…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करावी लागणार का ? केवायसी न केल्यामुळे माझा हप्ता वितरित झाला नसेल का ? या योजनेच्या अंतर्गत केवायसी करावी लागणार का अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत कारण अनेक महिलांचे पैसे अजूनही खात्यात जमा झाले नाहीत…
मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होत पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा पीएम किसानच डुप्लकेट अँप्लिकेशन बनवण्यात आलेलं होतं आणि अशाच प्रकारे आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देखील लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी आणि डाटा चोरी करण्यासाठी डुप्लकेट वेबसाईटच्या माध्यमातून लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी सांगितल जात आहे.
रामचंद्र साबले हवामान अंदाज – येथे पहा
Ladki bahin news ; पुढील हप्ता मिळवण्यासाठी KYC करावी लागनार का ?
सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी केवायसी करावी असं सांगितलं जात आहे, परंतु अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची केवायसी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले नाहीत..
लाडकी बहीण योजना आधार संलग्न योजना असल्यामुळे डीबीटी च्या माध्यमातून हप्त्याचं वितरण केल जात. त्यामुळे सध्या तरी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची केवायसी ची गरज नाही किंवा केवायसी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची मोहीम राबवली जात नाही.
त्यामुळे कुठल्याही वेबसाईटवरती केवायसी करण्यापूर्वी किंवा कुठल्याही वेबसाईटवरती आपला आधार किंवा आपल्या महत्त्वाची माहिती, मोबाईल नंबर, बँकेचे अकाउंट, स्वतःच्या नावाबद्दलची माहिती शेअर करताना काळजी घेण्याचा प्रयत्न करा. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही किंवा तशा प्रकारच्या कुठल्याही शक्यतासुद्धा नाही.
अशा प्रकारच्या या पसरवल्या जात असणाऱ्या संदेशापासून सावद राहण्याचा प्रयत्न करा.आणि जर तुम्हाला लाडकी बहीन योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर पैसे जमा होनं अजूनही सुरू आहे त्यामुळे काळजी करू नका…