Ladki bahin yojana ; जून महिन्याचे 1500 रूपये जमा होन्यास सुरुवात

Ladki bahin yojana ; जून महिन्याचे 1500 रूपये जमा होन्यास सुरुवात

राज्यभरातील लाखो महिला लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. जूनच्या हप्त्याच्या वितरणाला आज, ५ जुलै २०२५ पासून सुरुवात करण्यात आल्याची अधिकृत माहिती आदीती तटकरेंकडून देण्यात आली आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री, आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महीलांना जून महिन्याचा 1500 रूपयांचे वितरन करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. सर्व पात्र महीलांच्या आधार-लिंक बँक खात्यात हा निधी जमा होनार आहे.

या हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यासाठी शासनाने विविध विभागांमधून निधीची जुळवाजुळव केली. आदिवासी विकास विभागाकडून ३३५ कोटी रुपये आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ४१० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. या एकत्रित निधीला मंजुरी मिळाल्यानंतरच वितरणाची प्रक्रिया सुरू करणं शक्य झालंय अशी माहिती आहे.

Ladki bahin yojana ; आजपासून वितरण सुरू

५ जुलै २०२५ पासून सुरू झालेली ही वितरण प्रक्रिया ७ जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येनार आहे. या कालावधीत, सर्व पात्र महिलांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये DBT द्वारे 1500 रूपये जमा केले जातील.काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास तांत्रिक अडचण आल्यास, अशा उर्वरित महीलांच्या खात्यात ८ जुलै पर्यंत पैसे जमा होतील असेही सांगन्यात आले आहे.

Leave a Comment