Ladki bahin yojna ; 21 वर्षे पुर्ण झालेल्या महीलांना खुशखबर..अर्ज करता येनार ?
लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला योजनेच्या सुरुवातीला २१ वर्षांच्या नव्हत्या परंतु आता त्या २१ वर्षांच्या झाल्या आहेत त्यांना लाभ मिळणार का, याबाबत आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जानार आहे.
सुरूवातीला योजनेत ज्या महिला पात्र झाल्या तेवढ्याच महिलांना सध्या लाभ मिळत आहे, त्यानंतर योजनेत नवीन लाभार्थी जोडता येत नव्हते. मात्र आता ज्या महीलांचे 21 वर्ष वय पुर्ण झाले त्यांचा विचार सरकार करण्याची शक्यता आहे.
Ladki bahin yojna योजनेतून, या महिला अपात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे ९ लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी ५ लाख महिलांना यादीतून वगळण्यात आले होते.
आता दिव्यांग विभागाकडून लाभ घेणाऱ्या आणि स्वतःची वाहने असलेल्या महिलांना तसेच योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या अनेक महिला अपात्र ठरवल्या जानार आहेत.
या निर्णयामुळे अनेक महिलांना योजनेत सहभागी होन्याची संधी मिळु शकते, मात्र मंत्रीमंडळ बैठकीत यावर काय निर्णय होते त्यानंतर याबाबत आनखी स्पष्ट होईल..