New krushimantri महाराष्ट्राला नवीन क्रुषीमंत्री, हे आहेत नवे क्रुषीमंत्री…

New krushimantri महाराष्ट्राला नवीन क्रुषीमंत्री, हे आहेत नवे क्रुषीमंत्री…

 

माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलीय. मात्र, त्यांना मंत्रिमंडळाबाहेर न काढता, खातेबदल करून क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आलीय. तर कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलीय.

 

काल (31 जुलै) रात्री उशिरा माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आल्याची अधिसूचना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं जारी केली.

 

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहातच ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हीडिओ समोर आले होते. त्यानंतर कोकाटे आणि राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार सुरू झाला होता. तसंच, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती.

New krushimantri ; दत्तात्रय भरणे महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री

इंदापूरचे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री असतील.

 

दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, तसंच अल्पसंख्यांक मंत्रालयाची जबाबदारी होती. यातील क्रीडामंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून, ती जबाबदारी माणिकराव कोकाटेंकडे देण्यात आलीय. दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.

 

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेस पक्षाच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून दत्तात्रय भरणे पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले आहेत.दत्तात्रय भरणे इंदापूरमधून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

 

Leave a Comment