Pik-vima News ; पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा होणार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पीक विमा योजनेंतर्गत रखडलेली भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. खरिप २०२४ मधील ४०० कोटी रुपये आणि रब्बी २०२४-२५ मधील २०७ कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. ही रक्कम येत्या १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळेल असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केले आहे.
Pik-vima News भरपाई देण्यास उशीर
राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता वेळेवर न दिल्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास उशीर केला आहे. खरिप २०२४ साठी ४०० कोटी रुपये आणि रब्बी २०२४-२५ साठी २०७ कोटी रुपयांची रक्कम रखडली आहे. त्याशिवाय खरिप आणि रब्बी २०२३-२४ मधील २६२ कोटी रुपये अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत.
पीक विमा मंजूर झाल्यानंतर १० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करण्याचा नियम आहे. परंतु, अनेकदा विमा कंपन्यांनी आणि राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
Pik-vima News ; 15 दिवसात पिकविमा जमा
राज्य शासनाचा उर्वरित हिस्सा वितरित झाल्यानंतरच पीक विम्याचे वाटप केले जाईल असे पीक विमा कंपन्यांनी सांगितले आहे. राज्य शासनाचा 1015 कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता याच आठवड्यात वितरित केला जाईल असे कृषीमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.
त्यामुळे पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा केला जान्याची शक्यता आहे.