pm kisan yojana ; हे शेतकरी वगळले जानार, लवकर करा हे काम…
pm kisan yojana अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रूपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरण लवकरच होणार असून, त्यापूर्वी जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी शासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, शेतकऱ्यांना त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि ॲग्रीस्टॅक या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी १५ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
pm kisan yojana ; हे काम करा
pm kisan yojana चा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे आणि त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण होणे बंधनकारक आहे. अनेक शेतकरी अद्याप या प्रक्रियांपासून दूर असल्याने त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन, कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या माध्यमातून विविध मोहिमा राबवून शेतकऱ्यांना या प्रक्रियेसंबधी माहिती दिली जात आहे आणि त्यांना यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
तुमच्या गावची घरकुल यादी मोबाइल वर अशी पहा – येथे क्लिक करा
पूर्वी, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याची आणि KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिमhttps://krushiyojna.in/gharkul-yojana-maharashtra/ मुदत ३१ मे २०२५ निश्चित करण्यात आली होती. मात्र मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही. जवळपास २० टक्क्यांहून अधिक लाभार्थी शेतकरी ॲग्रीस्टॅक नोंदणी न केलेले आहेत. त्याचप्रमाणे, अनेक शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया देखील अपूर्ण आहे. यामुळे पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची किंवा अनेक गरजू शेतकरी हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे KYC आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी १५ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याने, स्वाभाविकच पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरण (Installment Distribution) १५ जून नंतरच होण्याची शक्यता आहे. यामुळे हप्त्याच्या वितरणात काहीसा विलंब होऊ शकतो.
pm kisan yojana च्या पुढील हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख शासनाकडून लवकरच जाहीर केली जाईल. तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपली प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे सुचवण्यात आले आहे.